सोशल नेटवर्किंग साईटवरही मोदीच अव्वल!

सोशल नेटवर्किंग साईटवरही मोदीच अव्वल!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या देशभरात `अब की बार मोदी सरकार`चा फिव्हर चांगलाच चढलाय.

ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचाच बोलबाला पाहायला मिळतोय. ट्विटरवर मोदींचे जवळपास ३७ लाख फोलोअर्स आहेत यावरूनच त्यांची क्रेझ पाहायला मिळतात. तर काँग्रेस नेते शशी थरुर यांचा याबतीत दुसरा क्रमांक लागतो. त्यांचे २१ लाख फॉलोअर्स आहेत.

आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनीही या रेसमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी त्यांच्या फॉलोअर्समध्ये ३ लाख २९ हजरांनी वाढ झाली आहे. त्यांचे एकूण १० लाख फॉलोअर्स आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी अजूनही ट्विटरशी कनेक्ट झालेले नाहीत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 11:46
First Published: Monday, April 14, 2014, 11:46
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?