संसदेत मोदींसहीत इतर खासदारांचा शपथग्रहण सोहळा

संसदेत मोदींसहीत इतर खासदारांचा शपथग्रहण सोहळा


www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

16 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरु झालंय.. दुसऱ्या दिवशी आज खासदारांना शपथ देण्यात आली. हंगामी सभापती (प्रोटेम स्पीकर) कमलनाथ यांनी आज लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहण सोहळ्याला सुरु केली. सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली.

कमलनाथ यांनी शपथ ग्रहण सोहळ्यात सर्वप्रथम नरेंद्र मोदींना शपथ दिली त्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण आडवाणी यांनी शपथ घेतली. आडवाणींनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खासदार म्हणून शपथ ग्रहण केली. सोनिया गांधी यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. तर त्यानंतर आलेल्या सुषमा स्वराज आणि उमा भारती यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.

नव्या सभापतींच्या निवडीसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्यात येतील. नव्या सभापतीपदासाठी भाजपाच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन (ताई) यांचं नाव पक्क झाल्याचं समजतंय.

संसदेचं हे विशेष अधिवेशन 11 जूनपर्यंत सुरू राहील. अधिवेशनात इतर कार्यक्रमांमध्ये 6 जून रोजी सभापतींची निवड होईल. 7 जून (शनिवार) आणि 8 जूनच्या (रविवार) ब्रेकनंतर 9 जून रोजी राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल. 10 जून आणि 11 जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल आणि पंतप्रधान धन्यवाद प्रदान करतील. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी याअगोदरच प्राप्त झालेली आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 11:45
First Published: Thursday, June 5, 2014, 12:58
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?