पंतप्रधानपदाची प्रतिभा ओळखून टीका करा - प्रियांका

पंतप्रधानपदाची प्रतिभा ओळखून टीका करा - प्रियांका

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

प्रियांका गांधी यांचं वक्तव्य लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत असल्याचं चित्र आहे. कारण अमेठीत प्रियांका गांधी यांनी आपले भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे.

या दरम्यान प्रियांका गांधी यांच्या भाषणाने सर्वच अवाक् झाले आहेत. कारण प्रियांका गांधी यांची भाषण शैलीही लोकांना तेवढीच खिळवून ठेवतेय, जेवढी नरेंद्र मोदी यांची भाषण शैली प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात लोकांना प्रभावित करत होती.

मात्र दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची प्रियांका गांधी यांनी पाठराखण केल्याचं चित्र आहे. प्रियांकानी राहुल गांधींचा बचाव करण्यासाठी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांनी क्षुल्लक गोष्टीत अडकू नये आणि विकासाच्या मुद्द्यावर लढावं, असं प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

राहुल गांधींची यांना कधी एखाद्या कॉमेडियनच्या नावाने चिडवलं जातं, तर कधी त्यांचा युवराज म्हणून उपहास केला जातो, मात्र आपण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहात, हे पद मोठं आहे. या पदाची प्रतिभा ओळखा, कारण नरेंद्र मोदी राहुल गांधींना नमूना तसंच शहजादा बोलतात.हे पंतप्रधानपदाची इच्छा बाळगणाऱ्या मोदींना शोभत नाही, अशी कोपरखळी प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता लगावली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 19:43
First Published: Tuesday, April 29, 2014, 19:43
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?