www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीकलम 370 वरून पंतप्रधान कार्यालय विरूद्ध जम्मू काश्मीर सरकार असा संघर्ष सुरू झालाय.
काश्मीरबाबतच्या कलम 370 बाबत नरेंद्र मोदी सरकार खुल्या चर्चेला तयार आहे, असं वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.
कलम 370 बाबत खुली चर्चा करण्याची भूमिका नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचार सभेत मांडली होती.
मात्र पहिल्यांदाच खासदार आणि राज्यमंत्री झालेल्या जीतेंद्र सिंग यांनी त्याबाबत तातडीनं सूतोवाच केल्यानं जम्मू काश्मीरमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 11:20