नाशिकमध्ये 'पॉलिटिकल लव्ह ट्रँगल'!

नाशिकमध्ये `पॉलिटिकल लव्ह ट्रँगल`!

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

लव्ह ट्रँगल... हा बॉलीवूड सिनेमांचा हिट फॉर्म्युला... सध्या असाच राजकीय प्रेमाचा त्रिकोण सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळतोय. शिवसेना आणि मनसे दोघांनाही मोदीप्रेमाचे उमाळे फुटत असल्यानं राजकारणात चांगलाच रंग भरलाय आणि यामध्ये आणखी तेल ओतण्याचं काम मनसेनं नाशिकमध्ये केलंय.

एखाद्या सिनेमात शोभावा असा `लव्ह पॉलिटिकल ट्रँगल` सध्या नाशिकमध्ये पहायला मिळतोय. नरेंद्र मोदी नक्की कुणाचे, शिवसेनेचे की मनसेचे...? याबद्दलचा संभ्रम आणखी वाढवण्याचं काम मनसेनं पुरेपूर केलंय... त्याचाचा दाखला म्हणजे मनसेनं प्रचारपत्रकं चक्क गुजराती भाषेतून छापली आहेत आणि त्यावर मोदींचा फोटोही लावलाय. मनसेचे उमेदवार प्रदीप पवारांनी ही शक्कल लढवलीय.

मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मनसेचे कान टोचल्यावरही मनसेची ही पत्रकबाजी सुरु असल्यानं शिवसेनेच्या गोटात संतापाची लाट उसळलीय.

तर दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीचे नेते मात्र अशा पत्रकबाजीची कल्पनाच नसल्याचं सांगत कानावर हात ठेवतायत. मनसेला मात्र यामध्ये काहीच गैर वाटत नाहीय, असं मनसे उमेदवार प्रदीप पवार सांगतायत.

नाशिकमधल्या मनसेच्या या पत्रकबाजीमुळे शिवसेनेचा पुरता तिळपापड झालाय. आता या सगळ्या संभ्रमात भाजप नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 12:12
First Published: Tuesday, April 15, 2014, 12:12
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?