तामिळनाडू : सत्तापालट होणार?

तामिळनाडू : सत्तापालट होणार?

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...

तामिळनाडूतील राजकारण नेहमीच द्रविडयन पक्षांभोवती घिरट्या घालतं राहिलंय. 1916 साली साऊथ इंडियन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना झाली. त्यानंतर याच असोसिएशनचं जस्टिस पार्टी असं नामकरण झालं. पेरिअर म्हणून ओळख असलेल्या इ व्ही रामास्वामी यांनी 1944मध्ये याच पक्षाला द्रविड कळघम असं नाव दिलं.

* 1916 साउथ इंडियन वेल्फेअरची स्थापना
* पुढे जाउन जस्टीस पार्टी नामकरणं
* 1944 मधे द्रविड कळघम नामकरणं
 
द्रविडा नाडू या वेगळ्या राज्याची मागणी करण्यासाठी द्रविड कळघम कार्यरत होता. ध्येय एकच असलं तरी दोन प्रमुख नेत्यांमधील मतभेदांमुळे पक्षाचं विभाजन झालं. सी. एन अण्णादुराई यांनी स्वतंत्र द्रविड मुन्नेत्र कळघमची स्थापना केली आणि 1956पासून सक्रिय राजकारणात पक्षाची मोहोर उमटायला सुरवात झाली.

स्वातंत्र्यानंतर राज्यांची भाषावार विभागणी करण्यात आली आणि 1960 च्या दशकात आपल्या हिंदी विरोधी धोरणामुळे डीएमकेची राज्यातील लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आणि निवडणुकांत काँग्रेसला धूळ चारत राज्यात पहिल्यांदाच डीएमकेनं सत्ता स्थापन केली. सी एन अण्णादुराई यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, डीएमकेचे ते पहिले मुख्यमंत्री.

1969मध्ये सीएन यांच्या मृत्यूनंतर करुणानिधी यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली. दरम्यान करुणानिधींच्या नेतृत्वाला पक्षातील एम जी रामचंद्रन यांनी आव्हान दिलं.

* अण्णादुराई डीएमकेचे पहिले मुख्यमंत्री
* 1969मधे अण्णादुराईंचा मृत्यु
* करुणानिंधीनी घेतली सुत्र हाती
* एम जी रामचंद्रनं यांच करुणानिधींना आव्हानं

एमजी रामचंद्रन यांनी 1972मध्ये पक्षातून बाहेर पडत ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात एआयएडीएमकेची स्थापना केली. पुढची चार दशकं तामिळनाडूच्या राजकारणात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांचाच बोलबाला राहिला.

1977 मध्ये एमजी रामचंद्रन यांची एआयएडीएमके सत्तेवर आली आणि रामचंद्रन मुख्यमंत्री झाले. 1987ला त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंत तामिळनाडूचे मुख्यमंत्री रामचंद्रमचं होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा एआयएडीएमकेचे दोन तुकडे झाले. एकीकडे एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन आणि दुसरीकडे जे जयललिता.

* 1977 मधे रामचंद्रन सत्तेवर
* 1987 रामचंद्रन यांचा मृत्यू
* पक्षात फूट जानकी रामचंद्रन आणि जयललिता वेगळ्या वाटेवर

अशा परिस्थितीतच 1989च्या निवडणुकीत एआयएडीएमकेचा पराभव झाला आणि जयललीता यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकत्र आला. डीएमके आणि एआयएडीएमके दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच कलह झाला मात्र 1967नंतर या दोन पक्षांनीच आळीपाळीने राज्यात सत्ता स्थापन केलीय. 1984, 1991, 2001 आणि 2011मध्ये एआयएडीएमके तर 1989, 1996, 2006 डीएमकेनं राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं.
 
* 1984, 1991, 2001 आणि 2011मध्ये एआयएडीएमके
* तर 1989, 1996, 2006 डीएमकेनं राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं.
 
राज्यावर सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी केंद्र सरकारला नेहमीच राज्यातून पाठिंबा मिळत राहिलाय. राज्यात डीएमके असो वा एआयएडीएमके तर केंद्रात एनडीए असो वा यूपीए राज्यातील राजकारणाचा केंद्रावर तितकासा परिमाण झाला नाही. 

टूजीमध्ये ए राजाची अटक आणि करुणानिधीच्या कन्या कनीमोळी यांच्या तिहार वारीनंतर मात्र डीएमकेनं यूपीएशी नातं तोडलं. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातली समीकरणं केंद्राशी कशी असतील हे ठरणार आहे.  

सोळाव्या लोकसभेसाठी तामिळनाडुमधे राजकीय गोळाबेरीज सुरु झालीये. 39 जागांसाठी ही लढाई तामिळनाडुमध्ये होतेय. मात्र राज्यात चर्चेचा विषय आहे, तो करुणानिधींचा कौटुंबिक कलह आणि जयललितांच्या राजकीय खेळी. नेमकी राज्याच्या राजकारणाची नस काय आहे हे सांगणारा हा एक रिपोर्ट.

जातीय राजकारण, सूडानं केलेल्या राजकीय खेळी आणि गृहकलह यामुळे तमिळनाडूचं राजकारण तापलय. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पार्टीचे सर्वेसर्वा एम करूणानिधी यांच्या मुलांनी एकमेकांविरोधात ठोकलेले शड्डु हा तामिळनाडुमध्ये चर्चेचा विषय झालाय.

करूणानिधी यांनी आपला मुलगा एम के अळगिरी यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत कारवाई केली, तर दुसरा मुलगा एम के स्टँलिनला पक्षाची महत्त्वाची धूरा देऊन घरातचं सत्तेची गोळाबेरीज होणार हे स्पष्ट केलय.

यूपीए 2 ला काही काळ डीएमकेनी साथ दिली खरी. पण कालांतरानी 2 जी प्रकरणांत ए राजा आणि त्यापाठोपाठ कनिमोळी  यांच्या तुरुंगवासानंतर करुणानिधी यांनी यूपीएची साथ सोडली. याचे स्वाभाविक पडसाद या निवडणूकीमध्ये उमटतील अशी चिन्ह आहेत. 

तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत, दिल्लीच्या तख्तावर सत्ता स्थापन करण्यासाठी तमिळनाडूमधला राजकीय सहभाग महत्वाचा असणार आहे हे जयललिता आणि करुणानिधी जाणून आहेत. त्यामुळे राज्यात जास्तीत जास्त जागा मिळवून केंद्रातील लोकसभेत स्वतःच वजन वाढविण्याची या दोन्ही पक्षांत चढाओढ सुरु आहे. 2009च्या लोकसभा निवडणूकीत डीएमकेने जयललिताच्या एआयएडीएमकेपेक्षा दुप्पट जागा मिळविल्या होत्या.
 
* ऑल इंडिया अण्णा द्रवीड मुनेत्र कळघम( जयललिता) 9
* डीएमके ( करुणानिधी )18  
 
पण तमिळनाडू निवडणुकांचा इतिहास आता पर्यंत सत्ताधारीच्या विरोधात अँन्टी कम्बन्सी  असाच राहिलाय.यंदाच्या निवडणूकीमध्ये जातीय मुद्दा आहेच, पण त्याचं वेळी जयलिलातांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांवर कोर्टाने ओढलेले ताशेरे हे मुद्दे देखील प्रचारात गाजतील. दुसरीकडे डीएमकेवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, चव्हाट्यावर आलेला अंतर्गत गृहकलह हे मुद्दे देखील लक्ष वेधतील.

* सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अन्टीइन्कबन्सी
* जातीय मुद्दे
* जयललितांवर कोर्टानं ओढलेले ताशेरे
* करुणानिंधींवर भ्रष्टाचाराचे आरोप
* करुणानिधींच्या घरातील अंतर्गत कलह
 
जयललिता भाजपचे पतप्रंधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशीही जवळीक साधुन आहेत त्याचवेळी तिस-या आघाडीचा पर्यायही जयललितांनी खुला ठेवलाय. नुकतीच त्यांनी सीपीआय ए शी निवडणुक पुर्व युती केलीये. त्यामुळे मतांची गोळाबेरीज सोपी होणारे.
 
डीएमकेनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी केंद्रात पुढील सरकार तयार होताना पक्षाचे जास्त खासदार असतील तर केंद्रात राहून दबाव राखत राज्यात परत येणा-या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता परत आणण्याचे मनसुबे आखले जातायत. एकुणचं डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांना स्वतःच अस्तित्व टिकवत, दोन मुलांमधील संघर्षाचा परिणाम पक्षावर होणार नाही याची खबरदारीही घ्यावी लागतेय, दुसरीकडे एआयएडीएमके पुन्हा पूर्वी प्रमाणे जोमाने कामाला लागून स्वतःच्य़ा जागा वाढविण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणं महत्वाच राहील. 
 
डीएमडीके पक्षाचे नेते विजयकांत (देसीय़ा मोरपक्कु द्रवीड कझगम) यांनी स्टालिनशी हातमिळवणी केलीये. त्याचा फायदा करुणानिंधींना होणारचं आहे. मात्र विजयकांत यांच्या बरोबर अझगिरीचे मतभेद असल्यामुळे विजयकांत आणि स्टालिन यांची हातमिळवणी होऊ नये असे प्रयत्न अझगिरी यांच्याकडुन होत होते.

मात्र अझगिरी विजयकांत यांना रोखण्यापासुन अपयशी ठरलेत. विजयकांत आणि स्टालिन एकत्र आलेत तर सख्खा भाउ अझगिरीनं वडिल आणि भावाविरोधात दंड थोपटलेत. याचा फटका करुणानिंधीना बसण्याची काही शक्यता  आहे. म्हणुनच तामिळनाडुचं राजकारणं रंगतदार आहे.
 
तामिळनाडूतले महत्वाचे नेते
जयललिता - मुख्यमंत्री तामिळनाडू
वय - 65 वर्ष
ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम
2011पासुन मुख्यमंत्री हा कार्यकाळ अपेक्षित
तामिळनाडुतील प्रसिद्ध अभिनेत्री
140 आघाडीच्या सिनेमात काम केलंय
तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणलं. मात्र जयललिता यांनी हे नाकारलं होतं.
तामिळनाडुच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री जयललिता राहिल्यात.

करुणानिधी
वय -  89
द्रविड मुनेत्र कळघम
सध्या चेन्नई मधे वास्तव्य
तीन पत्नी
चार मुलं, दोन मुली
स्टालीन आणि अझगिरी ही दोन मुलं राजकीयदृष्ट्या सहभागी
तर कनीमोळी राजकीय सहभागी
द्रविडीयन संस्कृतीचे पाठीराखे हेचं पक्षाचं ब्रीद 
 
अण्णादुराई यांनी द्रवीड मुनेत्र कळघम पक्षांची स्थापना केली. त्यांच्या मृत्युनंतर करुणानिधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली. गेल्या साठ वर्षात एकदाही करुणानिधी यांचा निवडणुकीत परभव झालेला नाही.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत 16 लोकसभेच्या जागांवरुन त्या 18 पर्यंत वाढल्या.

अनेक तमिळ सिनेमांचही लेखन करुणानिधी यांनी केलय.  तमिळ साहित्यात करुणानिधींच योगदान मोठं आहे. हिंदी विरोधातील मोठी मोहिम करुणानिधींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत चालवली.
 
एम के स्टालिन
वय 60 वर्ष
द्रविड मुनेत्र कळघम
करुणानिधी यांचे तिसरे पुत्र
 
1967 साली स्टालिननं आणिबाणीच्या विरोधात केलेल्या बंडामुळे त्याला जेलमधे जावं लागलं. आणि तेव्हापासुन स्टालिन राजकीय जीवनात प्रसिद्धीच्या झोतात आले.
1996 साली चेन्नई शहराचे थेट निवडुन आलेले पहिले महापौर होण्याचा मान स्टालिन यांना मिळाला.
2009 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डीएमके आणि युपीए शी आघाडी घडवण्यात महत्वाची भूमिका 
स्टालिनच्यानच्या नेतृत्वाखाली पक्षाला लोकसभेत मोठं यश मिळालं.

 
विजयकातं  
वय - 62 वर्ष
देसिया मोरपक्कु द्रविड कळघम चे संस्थापक
(डीएडीके)
14 सप्टेंबर 2005 साली डीएमडीके या प्रादेशिक पक्षाची घोषणा.
अभिनेते - राजकाराणी दुहेरी ओळक
कॅप्टन ऑफ तमिळ इंडस्ट्री
चित्रपटसृष्टीतल्या संपूर्ण कारकिर्दीत विजयकांतनी फक्त तमिळ सिनेमातचं काम केलं.
2011 च्या विधानसभा निवडणुकीत जयललितांशी हातमिळवणी केली आणि 41 जागा लढवुन 29 जागी विजय मिळवला.
विजयकांत यांनी तामिळनाडुत कॅप्टन टीव्ही सुरु केलाय.
नंतरच्या काळात जयललिता आणि विजयकांत यांचे राजकीय  मतभेद झाले आणि सध्या स्टालिन यांच्याशी विजयकातं यांचे राजकीय सूर जुळलेत.
 
एम के अलगिरी
वय 63 वर्ष
केंद्रीय रासायनिक खते मंत्री 2009 ते 2013
करुणानिधीचा दुसरा मुलगा
जानेवारी 2014 पर्यंत द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते  
नंतर पक्षातून हकालपट्टी
अझगिरी यांच्या मंत्रीपदाची कारकिर्द नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली.
बऱ्याचदा ते सभागृहादत उपस्थित नसायचे तर त्यांच्या खात्याबाबात उपस्थित झालेल्या प्रश्नांची दखल न घेतल्यानं त्यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवण्यात आले.
तर डीएमकेचे मंत्री किरुत्तीनन यांच्या खुन प्रकरणातही त्यांच्या सहभागाबाबत चर्चा होती.
अझगिरी यांचे वडील करुणानिधी आणि भाउ स्टालिन यांच्याशी झालेल्या राजकीय मतभेदानतर डीएमकेमधून अलगिरीची हकालपट्टी करण्यात आली.  



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 23:10
First Published: Friday, April 4, 2014, 23:10
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?