वरूण गांधींनी कुटुंबांचा विश्वासघात केला - प्रियांका

वरूण गांधींनी कुटुंबांचा विश्वासघात केला - प्रियांका
www.24taas.com, झी मीडिया, अमेठी

राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी आक्रमक असल्याचं दिसून येत आहेत. प्रियांका गांधी आणि चुलत भाऊ वरूण गांधी यांच्यातील वाकयुद्ध आता टोकाला गेलं आहे.

कारण वरुण गांधींनी आपल्या कुटुंबाचा विश्वासघात केला, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. प्रियांका गांधी अमेठीतील सभेत बोलत होत्या.

यावेळी बोलतांना प्रियांका गांधी म्हणाल्या, `निवडणूक ही तत्वांची लढाई असून कौटुंबिक चहा पार्टी नाही. आपल्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिलं.

तसंच आपल्या मुलाने अशाप्रकारची चूक केली असती तर आपण त्याला कधीही माफ केलं नसतं,` असं म्हणत त्यांनी मनेका गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

प्रियांका गांधघी यांनी यापूर्वी टीका करतांना म्हटलं होतं, `वरुण आपला भाऊ असला तरीही रस्ता भरटकला आहे आणि त्याला जनताच रस्ता दाखवेल, यावर वरुणच्या आई मनेका गांधी प्रियांका गांधी यांना चोख उत्तर दिल होतं. मनेका गांधी यांनी प्रियांका गांधी यांना उत्तर देतांना म्हटलं होतं, `जनताच ठरवेल कोण रस्ता भटकलं आहे`.

प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर वरूण गांधी यांनी ही उत्तर दिलं आहे की, `मी कधीही लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. माझा मार्ग हा देशाचा मार्ग आहे. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा मुद्दयांचं राजकारण करा,` वरूण गांधीनी सुलतानपूर भागातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही टीका केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 17:10
First Published: Tuesday, April 15, 2014, 19:22
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?