www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबिकनी ब्युटी पूनम पांडेने अरविंद केजरीवाल यांना संपर्क साधून आपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पूनम पांडेच्या या प्रस्तावामुळे आपमधील अनेक नेत्यांना चक्कर आल्यासारखं झालं आहे. कारण अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांनी आपला पसंती दिली आहे.
ग्लॅमरस चेहऱ्यांना सामिल करून घेण्याचा सपाटाही आपने चालवला आहे. अभिनेत्री गुल पनागला चंदिगडमधून तिकीट देण्यात आलं आहे.
पूनम पांडेने यापूर्वी टीम अण्णामध्ये सामिल होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र पूनम पांडेला कुणीही उत्तर दिलं नसल्याचं सांगण्यात येतंय.
याच प्रमाणे आप आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 13, 2014, 20:14