www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे उपाध्याक्ष राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या फेअरवेल पार्टीत राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "राहुल गांधी हे परदेशी आहेत जे फक्त सुट्ट्यांमध्ये भारतात येतात", असं म्हटलंय.
संजय राऊत म्हणाले देशात एवढी मोठी राजकीय घडामोड सुरू आहे आणि पंतप्रधानांच्या सन्मानार्थ आयोजित डिनर पार्टीला अनुपस्थिती हे योग्य नाही. संजय राऊत म्हणाले, राहुल भारतात सुट्ट्या एंजॉय करतात मग रंगरलिया करायला परदेशात जातात.
बुधवारी रात्री सोनिया गांधींनी पंतप्रधानांसाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं. त्यात राहुल गांधी उपस्थित नव्हते. पीएमओ कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी शनिवारीच मनमोहन सिंगाची भेट घेऊन आपण त्या पार्टीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं होतं. राहुल यांना पंतप्रधानांचे आभार मानले आणि सांगितलं की ते परदेश दौऱ्यावर जातायेत. मतमोजणीपूर्वी भारतात पोहोचतील. मात्र याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना विचारलं असता त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 15, 2014, 12:19