राहूलवरचं प्रेम चुंबनाने दिसलं

राहूलवरचं प्रेम चुंबनाने दिसलं
www.24taas.com, झी मीडिया, पश्चिम बंगाल

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची लोकप्रियता आता वाढू लागली आहे. आसाममध्ये आधी एका एका महिलेने आणि आता तर एका पुरूषानेच राहूल गांधी यांचं चुंबन घेतलं आहे. बंगालमध्ये राहूल गांधी यांच्या एका पुरूष समर्थकाने राहुलच्या गालावर चुंबन घेतले.

शनिवारी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबा जिल्ह्यात रॅलीनंतर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना लोकांनी घेरलं. शनिवारी दुपारी बेहरामपुरमध्ये पोहचलेले राहूल रॅलीनंतर तिथूनच्या मिठाईची चव घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेले. राहूल गांधींसोबत पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्‍यक्ष अधिर चौधरी हे देखील होते.

काँग्रेसच्या युवराजांवर तसंही मुलींच प्रेम दिसून येतंच. पण या वेळी तर चक्क एका पुरूषाला आपल्यावरील ताबा गमवावा लागला आणि त्याने सरळ राहूल गांधींना किस करुन टाकलं.

या प्रकरणानंतर राहुल गांधींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. राहूल थोडेसे लाजले आणि मिठाईचा आस्वाद घेऊन चटकन तिथून निघून गेले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 20, 2014, 10:30
First Published: Sunday, April 20, 2014, 10:30
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?