www.24taas.com, झी मीडिया, लातूरकाँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज लातुरमध्ये सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली. राहुल गांधी यावेळी अधिक संयम राखून बोलत असल्याचं दिसून आलं.
राहुल गांधी म्हणाले, गुजरातचा विकास हा खोटा आहे. नॅनो प्रकल्पामुळे तरूणांना रोजगार मिळेल असं सांगण्यात आलं. मात्र या प्रकल्पाने कोणत्याही तरुणाला रोजगार मिळाला नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
तसेच नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आणण्यासाठी मोदींनी टाटांना कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
दरम्यान, राहुल गांधींनी त्यांच्याच पक्षाच्या हत्या झालेल्या कार्यकर्त्या कल्पना गिरीप्रकरणावर बोलण्यावर त्यांनी मौन पाळलं. या सभेत राहुल गांधी ना कल्पना गिरींबाबत काहीही बोलले नाहीत, अथवा त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची इच्छाही दाखवली नाही.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची शक्ती महिलेंचे फोन टॅप करण्यात खर्च होते, अशी कोपरखळीही नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांनी नाव न घेता लगावली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 14, 2014, 19:43