www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली १९९४-९५ मध्ये राहुल गांधी `केंब्रिज युनिव्हर्सिटी`च्या ट्रिनिज कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते... हे तर सगळ्यांनाच माहीत आहे... पण, राहुलनं या कॉलेजमध्ये राहुल गांधी या नावानं नाही तर `राऊल विंसी` या नावानं प्रवेश घेतला होता, हे आता उघड झालंय.
राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या घडवून आणण्यात आली. यानंतर राहुलच्या सुरक्षेबद्दल कुटुंबीय काळजीत होते. त्यामुळेच राहुलचं कॉलेजमध्ये प्रवेश मिळवताना वेगळ्याच नावाचा वापर केला गेला. एका इंग्रजी दैनिकानं युनिव्हर्सिटी सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय.
याच ट्रिनिटी कॉलेजमधून राहुलचे पंजोबा जवाहरलाल नेहरू यांनी नॅच्युरल सायन्सेस आणि वडील राजीव गांधी यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण इथंच घेतलं होतं. पण, राजीव गांधी हे मात्र आपली डिग्री पूर्ण करू शकले नव्हते.
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या ट्रिनिटी कॉलेजचे फेलो डॉ. अनिल सील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनीच राहुलला इथं प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत केली होती. १९९५ मध्ये `राऊल विंसी` याच नावानं राहुल गांधी यांनी एम.फिलची उपाधी प्रदान करण्यात आली, असं युनिव्हर्सिटीचे वाईस चान्सलर प्रो. एलिसन रिचर्ड यांनी नुकतंच एका चिठ्ठीद्वारे जाहीर केलंय. एखाद्याच्या डिग्रीबद्दल असा वाद निर्माण व्हावा, हे केवळ दुर्दैवी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हा वाद संपुष्टात येण्यासाठी त्यांनी हे जाहीर करत असल्याचंही म्हटलंय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या डिग्रीवर विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देताना राहुल यांनी आपल्या पदव्या खऱ्या असल्याचं आपण शपथपत्र सादर केल्याचंही म्हटलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 19, 2014, 20:45