मुखवटा नाही, जिद्दीने निवडणूक लढवतोय - राज ठाकरे

मुखवटा नाही, जिद्दीने निवडणूक लढवतोय - राज ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर नाव न घेता हल्लाबोल केला. मला कोणाच्या मुखवट्याची गरज नाही. मी नरेंद्र मोदींना 2011मध्येच जाहीर पाठिंबा दिला आहे. जे बोललो आहे ते जाहीर. मला सेटींग करायचेही नाही. मी एका जिद्दीने ही निवडणूक लढवित आहे. माझे खासदार निवडून येणारच आणि ते दिल्लीत आवाज उठवतील. मी बाहेर राहून सत्ताधाऱ्यांना हादरवू शकतो तर आत आलो तर काय करू शकतो, असा परखड इशारा राज ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्राबद्दल बाहेरच्या राज्यातील नेते बोलतात, मात्र आपल्या राज्यातील नेते मूगगिळून गप्प असतात. मी ही निवडणूक एका जिद्दीने लढवित आहे. तरुणांना नोकरी नाही. पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही. आज अनेक प्रश्न् सोडविण्याएेवजी स्मारक, आरक्षण आणि खालच्या थराचे राजकारण केले जात आहे. ते केवल मतांसाठी आणि माझ्या दलित बांधवांना फसविण्यासाठी होत आहे. मी रेल्वे परीक्षेचा प्रश्न उचलून धरला. तेव्हा कुठे तो मार्गी लागला. ममता बॅनर्जी यांनी आदेश दिला स्थानिक भाषेतून रेल्वे भरतीची परीक्षा घ्यावी. हे का झाले. रेल्वे भरतीबाबत मी आवाज उठला, त्यानंतर डोळे उघडले. तसेच माझे खासदार दिल्लीत जातील, ते माझे म्हणणे पटवून देतील.महाराष्ट्राला काहीतरी मिळाले पाहिजे. माझ्या महाराष्ट्राचे भले झालेले पाहायचे आहे. त्यासाठी हे करत आहे, असे राज यांनी जाहीर सभेत सांगितले.

मनसेचे लोकसभा उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्या प्रचार सभेत राज बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यातील मतदार यादीच्या घोळाबाबत टीका केली. 1 लाख मतदारांची नावे गायबच कशी होतात. हे सर्व काय चालले आहे. खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. तुम्हाला जागे राहावे लागेल. तुम्ही मतदार याद्यांची पाहाणी केली पाहिजे. तुमच्यासाठी हे लोक (विरोधक) नाहीत. ते आपले भले करीत आहेत, अशी राज यांनी टीका केली.

राज ठाकरे यांची चेंबूर जाहीर सभेतील ठळक मुद्दे

- ममता बॅनर्जी यांनी आदेश दिला स्थानिक भाषेतून परीक्षा घ्यावी
- रेल्वे भरतीबाबत मी आवाज उठला, त्यानंतर डोळे उघडले
- माझे खासदार दिल्लीत जातील, ते माझे म्हणणे पटवून देतील
- महाराष्ट्राला काहीतरी मिळाले पाहिजे
- एका जिद्दीने ही निवडणूक लढवित आहे.
- महाराष्ट्राबद्दल बाहेरच्या राज्यातील नेते बोलतात, हे मात्र मूगगिळून गप्प
- तरुणांच्या नोकरीबाबत, पाणीप्रश्न याबाबत कोणही बोलत नाही
- मराठा आरक्षणाबाबतही तेच, समाजातील मुलांना, मुलींबद्दल काही नाही
- दलितांना फसवलं जात आहे, स्वत:चे भले करून घेतले जात आहे
- आंबेडकरांच्या नावाने राजकारण सुरू आहे.
- बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जागतिक दर्जाचे वाचनालय करा
- इंदू मिलमध्ये स्मारक उभारायचं असेल तर...
- पुतळे कसले उभारतात, गड -किल्ले यांची डागडूजी करा
- प्रत्येक देशातील नागरिकांना समाधानी करु शकलेलो नाही
- जगण्याच्या मूलभूत गरचा संपलेल्या नाहीत
- मला मागायचे असेल तर ते मी महाराष्ट्रासाठी मागेन
- माझे खासदार निवडून येणार म्हणजे येणार
- मी मनापासून बोलत असतो.
- मला काहीही फरक पडणार नाही
- मला मागायचे असेल तर ते मी महाराष्ट्रासाठी मागेन
- माझे खासदार निवडून येणार म्हणजे येणार
- मी मनापासून बोलत असतो.
- मला काहीही फरक पडणार नाही
- जाहीर केलं तरी बोलणार नाही केलं तरी बोलणार
- मला मोदींच्या मुखवट्याची गरज नाही, विकासावर पाठिंबा
- गुजरात पाहिला नंतरच मोंदीना पाठिंबा दिला
- मुलाखत देता येत नाही, तो काय देश संभाळणार
- राहुल गांधीपेक्षा मोदीच निश्चित सरस आहेत.
- बोट दाखवून बोलतो, हा काय बच्चन आहे का
-राजदीप सरदेसाई यांच्यावर राज ठाकरे यांची टीका
- तुमच्या आधीच मतदार याद्या तपासून घ्या
- सत्ताधाऱ्यांचे खालच्या थराचे राजकारण सुरू
- पुणे शहरातील गोंधळाबाबत राज ठाकरेंची टीका
- सत्ताधाऱ्यांचे खालच्या थराचे राजकारण सुरू
- पुणे शहरातील गोंधळाबाबत राज ठाकरेंची टीका
- खालच्या थराला जाऊन राजकारण होत आहे.
- मतदार यादीत नाव नसेल तर काय उपयोग

पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 18, 2014, 21:39
First Published: Friday, April 18, 2014, 21:58
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?