www.24taas.com, झी मीडिया, पुणेभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राज ठाकरेंच्या मनसेला उद्देशून चांगलाच टोला लगावलाय. `मी ऐकलंय की कुणीतरी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतंय... पण मोदींना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांना महायुतीत सामील व्हावं लागेल.. किंवा त्यांना आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करावा लागेल. त्याशिवाय केवळ पाठिंबा देण्याच्या भाषेला काहीच अर्थ नाही, असं राजनाथ सिंह यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जिथं जिथं सभा घेत आहेत, तिथं तिथं ते सांगतायेत की मनसे निवडून आलेले खासदार हे नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. मात्र पुण्यात मनसे आणि भाजप दोन्हीचे उमेदवार एकमेकांविरोधात आहेत. तेव्हा मोदींच्या पाठिंबा कसा... असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राज ठाकरेंचा पाठिंबा धुडकावून लावलाय.
जर पाठिंबा द्यायचा असेल तर महायुतीत या किंवा पक्ष भाजपात विलीन करा, असं म्हणणं हा राज ठाकरेंना टोला आहे की महायुतीत येण्याचं खुलं आवाहन... आता यावर राज ठाकरे काय उत्तर देतात हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.
पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 8, 2014, 20:21