www.24taas.com, झी मीडिया, मुंबईरिपाइं नेते रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केलाय.. राज यांनी केलेल्या महाराष्ट्राचा लालू या टीकेवर मी त्यांना काँग्रेसचा भालू म्हणणार नाही असा उपरोधिक टोला आठवलेंनी लगावलाय.. तसंच राज ठाकरेंना महायुतीत नको असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय..
राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या सभेत रामदास आठवले यांना महाराष्ट्राचा लालू असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना रामदास आठवले यांना पलटवार केला आहे. मला ते महाराष्ट्राचा लालू म्हणतात, पण मी त्यांना काँग्रेसचा भालू म्हणणार नाही.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीला निळा झेंडा हवा होता त्यामुळे त्यांनी जोगेद्र कवाडे आणि सुलेखा कुंभार यांना आघाडीत घेतले आहे. पण रिपब्लिकन मते हे आठवले गटाशी एकनिष्ट आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयोग फसणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 7, 2014, 20:36