रामदास कदमांच्या 'त्या' वक्तव्यावरून मोदी नाराज, शिवसेनेकडून स्पष्टीकरण

रामदास कदमांच्या `त्या` वक्तव्यावरून मोदी नाराज, शिवसेनेकडून स्पष्टीकरण
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महायुतीच्या कालच्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी पाकिस्तानबाबत केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 6 महिन्यांत पाकिस्तान नेस्तनाबूत होईल, असं कदम म्हणाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधानापासून स्वतःला आणि पक्षाला वेगळं काढलंय. हे विधान बाळासाहेबांच्या भूमिकेशीही विसंगत असल्याचं ठाकरे म्हणालेत.

रामदास कदम यांचे मुस्लिमविरोधी विचार हे त्यांचे वैयक्तिक असून त्या विधानाचा पक्षाशी संबंध नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. काल मुंबईतील बीकेसी मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचार सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेत बोलताना कदम यांनी अत्यंत भडक वक्तव्य केलं.

`मुंबईतल्या आझाद मैदानावर पाच लाख मुसलमान जमा होतात. हे मुसलमान पोलिसांवर हल्ला करतात, पोलिसांच्या गाड्या जाळतात, शहीदांचं स्मारक तोडतात आणि हे मुसलमान आमच्या महिला पोलिसांचा अपमान करतात. छत्रपती शिवाजी महाराजां पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रात माझ्या माय-भगिनींच्या अब्रूवर कोणी हात टाकणार असेल, तर नरेंद्र मोदी त्यांचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत,` असा इशारा शिवसेना रामदास कदम यांनी दिला.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देखील अशा नेत्यांमुळं एनडीएच्या प्रचाराची दिशा भरकटत असल्याची नाराजी व्यक्त केली. एनडीए विकास आणि सुराज्याच्या मुद्दा घेवून प्रचार करते आहे. पण एनडीएस समर्थक म्हणावल्या जाणाऱ्या गिरीराज सिंह, प्रवीण तोगडीया आणि रामदास कदम यांच्यासारखे नेत्यामुळं एनडीएच्या प्रचाराची दिशा भरकट असल्याचं मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 22, 2014, 20:44
First Published: Tuesday, April 22, 2014, 20:44
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?