राणे-शिवसेनेत जुंपली, ...तर विष खाईन - रामदास कदम

राणे-शिवसेनेत जुंपली, ...तर विष खाईन - रामदास कदम
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नारायण राणेंनी शिवसेना सोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली होती, असा रामदास कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. एकवेळ विष खाऊन मरेन, पण शिवसेना सोडणार नाही, असं कदमांनी राणे यांना ठणकावलं.

नारायण राणे यांनी आपल्याला शिवसेना सोडण्यासाठी काही कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. रामदास कदम शिवसेना सोडणार, अशा चर्चा सुरू असतानाच, मी कडवा शिवसैनिक आहे, एकवेळ विष खाऊन मरेन, पण शिवसेना सोडणार नाही, असं रामदास कदम यांनी ठासून सांगितलंय. आणि अखेर रामदास कदम शिवसेना सोडणार, ही अफवाच ठरलीय.

दरम्यान, विनायक राऊत यांनी केवळ एम.ए. च्या पार्ट वनच्या अॅडमिशनची सर्टीफीकेट सादर केली, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विनायक राऊत दहावी नापास असल्याचा दावा केला होता हा दावा फेटाळत विनायक राऊत यांनी आपल्या एम ए च्या सर्टिफिकेटची कागदपत्रच पत्रकारांसमोर सादर केली होती.

आता नितेश राणेंनी त्यावर पुन्हा उत्तर दिल्यानं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राणें यांनी डॉक्टरेट केल्याची कागदपत्रे देण्याचे प्रति आव्हान राऊत यांनी दिलेय. त्यामुळे हा वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 09:06
First Published: Thursday, March 27, 2014, 09:08
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?