वढेरा - अदाणी भेट जगजाहीर, काँग्रेस अडचणीत

वढेरा - अदाणी भेट जगजाहीर, काँग्रेस अडचणीत

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनी नुकतीच गुजरातचे औद्योगिक घराण्याचे प्रमुख गौतम अदाणी यांची घेतलेली भेट सध्या भलतीच गाजतेय. पण, यामुळे काँग्रेसच्या अडचणींत मात्र वाढ होताना दिसतेय.

गुजरातच्या एका वर्तमानपत्रानं रॉबर्ट वडेरा आणि अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांच्या भेटीचे फोटो प्रकाशित केल्यानंतर ही गोष्ट उघड झालीय. रॉबर्ट वडेरा अदाणी ग्रुपच्या एअरक्राफ्टनं अदाणी प्रोजेक्ट पाहण्यासाठी गुजरातच्या कच्छमध्ये गेले असताना हे फोटो घेण्यात आलेत.

महत्त्वाचं म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी याच अदाणी ग्रुपशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

रॉबर्ट वडेरा आणि गौतम अदाणी यांचे हे फोटो २००९ सालातील आहेत. त्यावेळी, वडेरा गुजरातच्या मुंदडामध्ये अदाणी पोर्ट आणि अदाणी पॉवर प्लान्ट पाहण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी, वडेरा आणि गौतम अदाणी एकत्रच एका खाजगी एअरक्राफ्टनं इथं दाखल झाले होते. पण, राहुल गांधी यांनी मात्र नरेंद्र मोदींवर अदाणी ग्रुपच्या खाजगी एअरक्राफ्टनं प्रवास करण्यावरून टीका केलीय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 12, 2014, 12:57
First Published: Saturday, April 12, 2014, 12:57
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?