www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनव्या सरकारचा प्रभाव पहिल्या आठवड्यात कायम आहे. सेन्सेक्सनं बाजार उघडताच 300 अंकांची उसळी घेतली तर निफ्टीमध्ये 80 अंशांची वाढ झालीय. तर रुपयानंही डॉलरच्या तुलनेत गेल्या अकरा महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. मोदी लाटेचा हा प्रभाव शेअर बाजारात आजही कायम आहे.
शुक्रवारी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी भाजपच्या विजयाची चाहूल लागताच शेअर बाजारानं 25 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर त्यात घट झाली होती. आज सकाळी बाजार सुरू होताच निर्देशांकात 275.82 अंकांची वाढ पहायला मिळाली. त्यामुळे निर्देशांक 24 हजार 397 वर पोहचला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टीमध्येही 75 अकांनी वाढ झाली आहे.
आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने उसळी घेत चांगले संकेत दिले. त्यामुळे दिवसभरात शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. निर्देशांक वधारल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपयानंही गेल्या अकरा महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 58.47 रुपयांवर पोचलं होतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 19, 2014, 11:21