बप्पीदांच्या प्रचारासाठी लता, आशा आणि सलमान!

बप्पीदांच्या प्रचारासाठी लता, आशा आणि सलमान!

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये जनतेला बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना प्रत्यक्षात पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. याच श्रेय जातंय अनेक राजकीय पक्षांना ज्यांनी काही स्टार्सना निवडणुकीत संधी दिलीय.

भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत उतरलेले प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या प्रचारासाठी अनेक स्टार्स सहभागी होणार असल्याचं समजतंय. सुपरस्टार सलमान खान आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले हेदेखील बप्पीदांच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचं समजतंय.

`डिस्को किंग` लाहिरी यांनी हुगली जिल्हास्थित आपल्या मतदारसंघाला - श्रीरामपूरला एका पर्यटन केंद्रात बदलून टाकण्याची इच्छा जाहीर केलीय. याच भागाला निवडणुकीदरम्यान बॉलिवूडची चमक-धमक पाहण्याची संधी मिळेल.

लाहिरी यांच्या प्रचारदौऱ्याचे संजोजक कृष्णा भट्टाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, सलमाननं बप्पीदांच्या प्रचारासाठी आपला होकार दिलाय.

लता आणि आशाही या प्रचार दौऱ्यासाठी हजर राहतील, अशी आशा बप्पी लाहिरी यांना आहे. लाहिरी यांची सलमान खान, हृतिक रोशन यांच्यासोबतच अनेक बॉलिवूड स्टार्सशी जवळचे संबंध आहेत.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 21:16
First Published: Thursday, April 3, 2014, 21:16
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?