अनंत गितेंची शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी निवड

अनंत गितेंची शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी निवड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यात महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मातोश्रीवर चांगलीच लगबग होती. हा विजय साजरा करण्यासाठी मातोश्री सजली. सकाळपासूनच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. अनंत गिते, राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ या सगळ्या निवडून आलेल्या खासदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. दरम्यान महायुतीच्या विजय सोहळ्यासोबतच काल मातोश्रीवर एक महत्वाचा नर्णय घेण्यात आला. सलग सवाव्यांदा खासदारकी भूषवणारे शिवसेनेचे विजयी उमेदवार अनंत गिते यांची शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

अनंत गिते यांची संसदीय गटनेतेपदी निवड म्हणजेच त्यांची कॅबिनेटपदी वर्णी.. आता त्यांना कोणतं खातं मिळतं याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 18, 2014, 09:09
First Published: Sunday, May 18, 2014, 09:09
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?