जसवंत सिंहांचं भाजपमधून ६ वर्षांसाठी निलंबन

जसवंत सिंहांचं भाजपमधून ६ वर्षांसाठी निलंबन
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

जसवंत सिंह यांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. राजस्थानमधल्या बारमेरमधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या जसवंत सिंहांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.

बारमेरमध्ये १७ एप्रिलला मतदान होणार असून त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता. जसवंत सिंह यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं पक्षानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय. बंडखोर नेते सुभाष महारिया यांचीही पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

काँग्रेसमधून आलेल्या सोनाराम चौधरी यांना जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असा निकष लावत भाजपने बारमेर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या या निर्णयाला विरोध करत जसवंतसिंह यांनी बारमेरमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. आपली उमेदवारी मागं घेण्यास जसवंतसिंह यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळं पक्षाच्या शिस्तपालन समितीनं त्यांच्यावर कारवाई केलीय. सुभाष महारिया यांनीही पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करत परस्पर उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळं त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली; अशी माहिती भाजपनं दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 30, 2014, 10:19
First Published: Sunday, March 30, 2014, 10:19
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?