स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगींचं मतदान

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगींचं मतदान
www.24taas.com, झी मीडिया, किन्नोर

हिमाचल प्रदेशच्या कल्पामध्ये मंडी लोकसभा मतदारसंघासाठी श्याम नेगी यांनी मतदानाचा हक्क आज बजावला.

हिमाचल प्रदेशातील 97 वर्षांचे श्याम नेगी यांनी देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ते आतापर्यंत मतदान केलं आहे. श्याम नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार आहेत.

1951 साली त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं होतं. हिमाचल प्रदेशातील किन्नोरमध्ये बर्फामुळे रस्ते बंद होतात. हिमाचल प्रदेशात 1951 मध्ये काही भागात सहा महिने आधी मतदान करण्यात आलं होतं.

श्याम नेगी यांनी आतापर्यंत 28 वेळा मतदान केलं, यात 16 वेळेस लोकसभा तसेच 12 वेळेस विधानसभेसाठी मतदान नेगींनी केलं.

श्याम नेगी यांनी कडाक्याच्या थंडीच बर्फ पडत असतांना, 25 ऑक्टोबर 1951 रोजी मतदानाच्या रांगेत पहिला नंबर लावला होता. नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून ओळखले जातात.

श्याम सिंह नेगी हे शाळा मास्तर होते. नेगी यांनी 1951 पासून प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं. व्हिडीओत त्यांनी आपल्या लोकशाहीला मजबूत करणे महत्वाचं आहे, यासाठी मतदान करा, असं म्हटलं आहे.

यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओला जवळ-जवळ 10 लाख लोकांनी पाहिला आहे. गूगलने नेगींवर व्हिडीओ बनवल्यानंतर श्याम नेगी हे नाव उजेडात आलं आहे. निवडणूक आयोगाने श्याम नेगी यांची गौरव केलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 13:14
First Published: Wednesday, May 7, 2014, 13:28
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?