आझमींनी तोडले अकलेचे तारे, सून आयेशा टाकियाची टीका

आझमींनी तोडले अकलेचे तारे, सून आयेशा टाकियाची टीका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बलात्कार प्रकरणांतील पीडितेलाही शिक्षा व्हायला हवी, असं धक्कादायक वक्तव्य करत अबू आझमींना आपल्या अकलेचे तारे तोडल्यानंतर त्यांची सून आणि अभिनेत्री आयेशा टाकियाने ट्‌विटरवरून टीका केली आहे.

ट्‌विटरवरून आयेशा टाकिया म्हणाली, `माझ्या सासऱ्यांनी केलेल्या वक्तव्याबाबतची माहिती समजली आहे. परंतु, मी आणि फरहान आम्ही दोघेही या विचाराच्या विरुद्ध आहोत.`

`एखादी महिला एखाद्या पुरुषाबरोबर सहमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल ती सुद्धा फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे. परंतु, महिलेची चूक असेल तर तिला काहीच होत नाही. तिलाही फाशीची शिक्षा व्हायला हवी, असे आझमी म्हणाले होते.

आयेशा म्हणाली, मी आणि माझे पती सासऱ्यांच्या विचाराशी सहमत नाही. सासऱयांचा तसा बोलण्याचा उद्देश नसेल. बहुतेक त्यांनी दुःखी अंतकरणामधून हे वक्तव्य केलेले असावे.`







`बलात्कार प्रकरणांत फाशीची शिक्षा व्हायला हवी, असं इस्लाममध्ये सांगितलं गेलंय. पण, इथे मात्र पुरुषांनाच शिक्षा होते... स्त्रिया मात्र यातून अलगद सुटून जातात... स्त्रियाही तितक्याच दोषी आहेत ना` असं अबू आझमी यांनी म्हटलंय.

`भारतात, तुमच्या इच्छेनुसार शरीर संबंधांना परवानगी दिली गेलीय. पण, याची तक्रार केली गेली तर मात्र हा गुन्हा ठरतो. आत्ता आपण अनेक केसेस पाहतो. कुणी हात लावला तर मुली तक्रार करतात आणि हात लावला नाही तरीही करतात. तेव्हा ही एक समस्या होते. जर बलात्कार तुमच्या संमतीनं किंवा संमतीशिवाय होत असतील तर इस्लाममध्ये त्याला शिक्षा सांगण्यात आलीय`

`एखादी स्त्री विवाहीत किंवा अविवाहीत एखाद्या परपुरुषासोबत तिच्या संमतीनं किंवा संमतीशिवाय जात असेल तर तिलाही फासावर चढवलं जायला हवं... दोघांनाही फाशी व्हायला हवी`, असं आझमी यांनी म्हटलंय.

`स्त्री-पुरुष संबंधांमध्ये सहमती असो अथवा नसो त्या महिलेला फाशी देण्यात यावी... ज्या महिलांवर बलात्कार झालाय त्यांनाही शिक्षा व्हायला हवी` अशी बेताल बडबड आझमींनी केलीय. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बेताल बडबड केलीय. या प्रकरणी `झी मीडिया`नं त्यांना जाब विचारला असता, आझमींनी `झी मीडिया`चे प्रश्न अर्धवट सोडून पळ काढला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 17:19
First Published: Friday, April 11, 2014, 17:34
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?