www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी/सिंधुदुर्गआजचा दिवस कोकणासाठी झंजावाती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज कोकणात सभा होताहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली आणि रत्नागिरीत जाहीर सभा होतीये.
या सभेमुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये भगवा जल्लोष संचारलाय. रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आलीये. तर कणकवलीतीली उपजिल्हारुग्णालयाच्या समोरील मैदानात दुसरी सभा होणार आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवारही आज सिंधुदुर्गात येत आहेत. सावंतवाडीत त्यांची सभा होणार आहे. सिंधुदुर्गातील जिमखाना मैदानावर ही सभा होणार आहे.. मात्र या सभेकडे जिल्हा राष्ट्रवादीनं पाठ फिरवलीये..
निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडला असून ते फक्त मोदींचं गुणगाण गातायत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. तर तुम्ही किती वारसे बदलले असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केलाय. त्यामुळं आज हे दोन नेते एकमेकांवर काय चिखलफेक करतात हे पाहावं लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 13, 2014, 08:40