ममता आणि पवारांनी काँग्रेसमध्ये परतावे - दिग्विजय सिंह

ममता आणि पवारांनी काँग्रेसमध्ये परतावे - दिग्विजय सिंह

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये मतमतांतरे दिसून येतायेत. शरद पवार, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमध्ये परतावे, असं आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केलंय.

तर राहुल गांधींच्या युवा ब्रिगेडचे मिलिंद देवरा यांनी पराभवाचं खापर सल्लागारांवर फोडलंय.

दुसरीकडे काँग्रेस नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनीही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या सल्लागारांवर टीका केलीय. त्यांनी सल्लागारांकडे अनुभवच नसल्याची टीका केलीय. तर लोकसभेचे निकाल पक्षासाठी धक्कादायक आहेत.

आगामी निवडणूत काँग्रेस पक्षासाठी कठीण असणार असल्याची कबुली काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीये.

आगामी निवडणुकांमध्ये आवश्यक ते बदल करुन अधिक ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवायला हवी, असही मत चव्हाण यांनी मांडलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 22, 2014, 21:02
First Published: Thursday, May 22, 2014, 21:02
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?