www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलंय. त्यांच्या फेसबुक पेजवर पवारांनी त्यांचं मत नोंदवलंय. राज यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, असं पवार यांनी म्हटलंय.
फेसबुकवर शरद पवार म्हणतात, `उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, उद्धव यांना पक्ष वारसाहक्काने मिळाला; हा या दोघांमधील मूलभूत फरक आहे. यामुळे राज यांनी महायुतीत जावं किंवा मोदीला पाठींबा द्यावा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचाच आहे. राहिला प्रश्न उद्धव यांचा, तर त्यांचे वक्तव्य मला नोंद घेण्याच्याही योग्यतेचे वाटत नाही`
महत्त्वाचं म्हणजे, `शिवसेना रिजनल पक्ष असला तरी आमचा ओरिजनल पक्ष आहे... दुसरा पक्ष फोडून तोडून, विचार चोरून पक्ष स्थापन करता येतो पण चालवता येत नाही... मुद्दे चोरणारी औलाद शिवसेनेची नाही` असं म्हणत मंगळवारी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 1, 2014, 23:36