www.24taas.com, झी मीडिया, जालनाकाँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या डोक्यावर परिणाम झालाय. आमची सत्ता आली की त्यांचा योग्य उपचार करू अशा शब्दात मोदींवर शरद पवारांनी टीका केली. ते जालना इथं बोलत होते.
भाषणात शरद पवार यांनी अहमदाबादमधल्या जाफरी हत्याकांडाचाही उल्लेख केला होता. मुंबईत दंगल झाली तेव्हा आपण स्वतः जाऊन लोकांना धीर दिला होता. मात्र काँग्रेस खासदाराला जिवंत जाळल्यावरही मोदी जाऊन भेट घेऊ शकले नाहीत असं पवार म्हणाले.
पवार म्हणाले मोदी देशासाठी धोकादायक आहेत. ते म्हणाले भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला महाराष्ट्रातील गारपिटीमुळं प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांसोबत काही घेणंदेणं नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 31, 2014, 11:52