शिवसेना विरोधात यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार

शिवसेना विरोधात यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. हे सर्व उमेदवार शिवसेनेला जोरदार टक्कर देणार आहेत. यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार देण्यात आलाय. शिवसेनेने आधीच भावना गवळी यांना उमेदवारी दिलेय. त्यामुळे शिवसेना-मनसे सामना पाहायला मिळणार आहे.

पुणे वगळता भाजपविरोधात मनसेने उमेदवार दिलेले नाहीत. तर पुणे-मावळ आणि रायगड या दोन ठिकाणी शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे राजू पाटील यांना रिंगणात असल्याने ते शिवसेनेच्या भावना गवळींना देणार टक्कर देतील.

सुरेश (ऊर्फ बाळ्या मामा) गोपीनाथ म्हात्रे यांना भिवंडी लोकसभा मतदार संघातून संधी मिळालीय तर नुकतेच शिवसेनेतून मनसेमध्ये दाखल झालेल्या अभिजीत रमेश पानसे यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आलीय. पानसे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आता ठाण्यात राजन विचारे - अभिजीत पानसे असा सामना रंगणार आहेत.

मनसेची उमेदवार यादी

* दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर

* दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर

* उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर

* ठाणे - अभिजित पानसे

* भिवंडी - सुरेश (ऊर्फ बाळ्या मामा) गोपीनाथ म्हात्रे

* कल्याण - डोंबिवली - राजीव पाटील

* नाशिक - प्रदीप पवार

* शिरुर - अशोक खंडेभराड

* पुणे - दीपक पायगुडे

* यवतमाळ-वाशिम - राजू पाटील


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 21, 2014, 21:05
First Published: Friday, March 21, 2014, 21:16
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?