बबनराव घोलप : त्यांचे प्रकरण आणि काय आहेत आरोप?

बबनराव घोलप : त्यांचे प्रकरण आणि काय आहेत आरोप?
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

शिर्डीतील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार बबनराव घोलप अडचणीत आलेत. मुंबईतील माझगाव कोर्टानं त्यांना ३ वर्ष सश्रम कारावास आणि १ लाख दंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. त्यांच्यावर नेमके काय आहेत आरोप आणि काय आहे हे प्रकरण, यावर एक नजर.

घोलप यांच्या पत्नीलाही शिक्षा सुनावण्यात आलीये. यामुळे घोलपांची उमेदवारी अडचणीत आलीये. तत्कालीन युती सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री असताना घोलप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सेक्रेटरी मिलींद यवतकर यांनी सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. युतीच्या काळात मंत्रीपदी असताना घोलप यांनी महत्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मोद्योग महामंडळात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा यवतकर यांचा आरोप आहे. दरम्यान, शिवसेना आता लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्यावर कुठल्या तोंडानं बोलणार असा सवाल विचारला जातोय.

काय आहे प्रकरण, एक नजर
- युतीच्या काळात
मंत्री असताना गैरव्यवहार

- १९९९ मध्ये विविध
महामंडळांमध्ये भ्रष्टाचार

- राष्ट्रवादीचे पदाधिकारी
मिलिंद यवतकरांची तक्रार

- २००१साली ५५९८पानी आरोपपत्र,
१५ वर्षे चालला खटला

- १९४ साक्षीदार पैकी
३५ साक्षीदारांची तपासणी

-पोलिस अधिकारी रमेश महाले यांनी केला तपास

- अण्णा हजारेंनीही केले होते
घोलपांविरुद्ध आंदोलन

- घोलपांना द्यावा लागला होता
मंत्रीपदाचा राजीनामा

- पत्नी शशीकला
यांच्याविरुद्धही तक्रार

- मुख्य सरकारी वकील कल्पना चव्हाण
यांनी मांडली बाजू

घोलप यांच्यावर नेमके काय होते आरोप
- मंत्रिपदाच्या काळात बेहिशोबी
मालमत्ता जमवल्याचा आरोप

- मंत्री झाल्यानंतर केवळ ३ वर्षांत
पत्नीच्या नावे ६६ लाख गुंतवले

- अवामी को.ऑ.बँकेत पैसे
गुंतवल्याने शासनाचे ८ कोटींचे नुकसान

- बँकेचा गैरव्यवहार दडपण्यासाठी
४० लाखांची लाच दिल्याचे निष्पन्न


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 21, 2014, 15:55
First Published: Friday, March 21, 2014, 16:01
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?