शिवसेनेचा प्रचार धडाका, उद्धव ठाकरेंच्या १९ सभा

www.24taas.com, झी मिडिया, मुंबई

शिवसेनेच्या प्रचाराचा धडाका उद्यापासून पाहायला मिळणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात दिसणार आहे. राज्यभरात तसा दौरा आखण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रचाराचेरणशिंग फुंकले आहे.

उद्धव ठाकरे शुक्रवारी ४ एप्रिलपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात १९ मतदारसंघांत सभा होणार असून या सभांमधून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेतून हद्दपार करा, तसेच भ्रष्टाचारावर उद्धव भाष्य करण्याची शक्यता आहे. तसे शिवसेनेकडून स्पष्ट कऱण्यात आले आहे.

१०, १७ आणि २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात तीन टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक जिंकण्याच्या तयारीसाठी महायुती कऱण्यात आली आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं-स्वाभिमानी शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिव संग्राम संघटना या महायुतीने कंबर कसली आहे.

४ एप्रिलपासून दौऱ्याला सुरूवात होईल. पहिला सभा बुलडाणा येथे होणार आहे. मुंबई, ठाण्यात दोन सभा ४ ते १९ एप्रिल दरम्यान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा,कोकण, उत्तर महाराष्ट्रात एकूण १५ मतदारसंघांत जाहीर सभा होणार आहेत. तर मुंबई, ठाण्यातील पाच उमेदवारांसाठी ठाणे आणि मुंबई येथे शेवटच्या टप्प्यात दोन सभा होणार आहेत.

प्रचार दौरा कार्यक्रम

- शुक्रवार, ४ एप्रिल सायं. ५.०० वा. बुलडाणा

- शनिवार, ५ एप्रिल सायं. ५.०० वा. अमरावती

- रविवार, ६ एप्रिल सायं. ५.०० वा. यवतमाळ-वाशीम

- सोमवार, ७ एप्रिल सायं. ५.०० वा. रामटेक

- मंगळवार, ८ एप्रिल सायं. ४.०० वा. धाराशीव

- बुधवार, ९ एप्रिल सायं. ५.०० वा. परभणी

- गुरुवार, १० एप्रिल सायं. ५.०० वा. हिंगोली

- शुक्रवार, ११ एप्रिल सायं. ५.०० वा. कोल्हापूर

- शनिवार, १२ एप्रिल सायं. ५.०० वा. शिर्डी

- रविवार,१३ एप्रिल सायं. ४.०० वा. सिंधुदुर्ग(कणकवली), रात्री. ८.०० वा. (रत्नागिरी)

- सोमवार, १४ एप्रिल सायं. ४.०० वा. शिरूर, सायं. ६.०० वा. मावळ (चिंचवड)

- बुधवार, १६ एप्रिल सायं. ५.०० वा. औरंगाबाद

- गुरुवार, १७ एप्रिल सायं. ५.०० वा. कल्याण

- शुक्रवार,१८ एप्रिल सायं. ५.०० वा. नाशिक

- शनिवार, १९ एप्रिल सायं. ५.०० वा. रायगड

- रविवार, २० एप्रिल सायं. ५.०० वा. ठाणेे

- सोमवार, २१ एप्रिल सायं. ५.०० वा. मुंबई


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 12:44
First Published: Thursday, April 3, 2014, 12:49
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?