स्वार्थासाठी सेनेला बाळासाहेबांचा विसर - पवार

स्वार्थासाठी सेनेला बाळासाहेबांचा विसर - पवार
www.24taas.com, झी मीडिया, परभणी

`शिवसेनेलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडला आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना जन्माला घातली त्यांच्याच तोंडात बाळासाहेबांचे नाव न येणे; हे दुर्दैवचं म्हणावे लागेल` अशा कटू शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेवर टीका केलीय. शरद पवार परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारासभेत बोलत होते.

`देशात सर्वच ठिकाणी भाजप मोदींच्या नावाचा गजर करत आहे. यामध्ये शिवसेना कुठेचं दिसत नाही. शिवसेना तर आता बाळासाहेबांचं नाव सोडून मोदी-मोदी जप करत आहेत. यातच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पण, मोदींचा खरं म्हणजे भारतीय लोकशाहीवर विश्वास नाही` असं म्हणत पवारांनी शिवसेना - भाजपवर हल्ला चढवलाय.

शिवसेना केवळ स्वार्थासाठीच मोदींच्या नावाचा जप करत आहे. लोक शिवसेनेला माफ करणार नाही. काही पक्षांकडून जाती-धर्माच्या नावावर द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे, अशा शब्दांत पवारांनी महायुतीवर टीका केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 11, 2014, 13:28
First Published: Friday, April 11, 2014, 13:28
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?