शरद पवार - राज ठाकरेंबाबत मनोहर जोशींचा बॉम्बगोळा

शरद पवार - राज ठाकरेंबाबत मनोहर जोशींचा बॉम्बगोळा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

२००९च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेनेसोबत युती करायची होती, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलाय.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार जोशी यांना उद्धव ठाकरेंनी पवारांसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. मात्र नंतर पवारांनी निर्णय का बदलला याची आपल्याला माहिती नाही, असं जोशी म्हणाले.

गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरेंनी पवारांना महायुतीत येण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं... त्या पार्श्वभूमीवर जोशींनी दिलेल्या या माहितीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं मनोहर जोशींचा हा दावा फेटाळलाय. जोशींना आता शिवसेनेत काही स्थान उरलेलं नाही. त्यामुळे ते बिनबुडाची विधानं करून गेलेली पत परत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं NCP प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.

तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, असं आपल्याला आजही वाटतं. आपण त्यासाठी जरूर प्रयत्न करू असं मनोहर जोशी म्हणालेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 19, 2014, 19:39
First Published: Saturday, April 19, 2014, 19:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?