काँग्रेस कार्यकारिणीने सोनियांचा राजीनामा फेटाळला

काँग्रेस कार्यकारिणीने सोनियांचा राजीनामा फेटाळला

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला होता.

मात्र काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा फेटाळला आहे. या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखिल उपस्थित होते.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. काँग्रेस अध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र ती कार्यकारिणीने फेटाळून लावली. यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची आजची बैठक संपली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 19, 2014, 19:33
First Published: Monday, May 19, 2014, 19:33
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?