सोनियांवर फुलांची उधळण; राहुलची वरुण गांधींकडून स्तुती

सोनियांवर फुलांची उधळण; राहुलची वरुण गांधींकडून स्तुती
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसभवनमध्ये होमहवन केल्यानंतर सोनिया यांनी आपला अर्ज दाखल केलाय. रायबरेलीच्या जनतेनं नेहमीच भरभरुन प्रेम दिल्याचं यावेळी सोनिया गांधींनी सांगितलं.

तसंच अमेठीच्या जनतेवर पूर्ण विश्वास असून यावेळीही जिंकून येणारच असा दावा सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी रायबरेलीत सोनिया गांधींचा रोड शो झाला. काँग्रेस समर्थकांनी फुलांचा वर्षाव करत सोनिया गांधींचं स्वागत केलं.यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोनियांच्या गाडीचं सारथ्य केलं.

दुसरीकडे भाजप नेते वरूण गांधी यांनी चक्क राहुल गांधी यांच्या कामाची स्तुती केलीय. सुल्तानपूरमध्ये प्रचार करताना वरूण गांधींनी राहुल गांधींच्या कामाचं कौतुक केलं. तर वरुण गांधी जे बोलतायत ते खरं असून अमेठीच्या जनतेला आमचं काम आवडलंय, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी रायबरेलीत दिलीय.

सोनिया गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींनी ही प्रतिक्रिया दिलीय. एकूणच भाजप मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाच्या मॉडेलवर ही निवडणूक लढत आहे. मात्र वरूण गांधींनी राहुल गांधीनी केलेल्या कामाचं कौतुक केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 2, 2014, 15:38
First Published: Wednesday, April 2, 2014, 18:34
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?