मोदींच्या सुरक्षेसाठी एसपीजी टीम सज्ज!

मोदींच्या सुरक्षेसाठी एसपीजी टीम सज्ज!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा देण्यासाठी ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (एसपीजी)ची एक टीम गांधीनगरला रवाना झालीय. नरेंद्र मोदींनी वाराणसी आणि वडोदरा या दोन्ही मतदारसंघातून विजय प्राप्त केलाय. मोदींनी निवडणूक जिंकताच एसपीजी टीम शुक्रवारी गांधीनगरला रवाना झालीय.

मोदी सध्या गांधीनगरमध्ये आहेत. ते आज आपल्या आईची भेट घेणार आहेत. तसंच आज त्यांचा रोड शोदेखील आयोजित करण्यात आलाय. मोदी पंतप्रधानपदावर आरुढ झाले तर त्यांच्या सुरक्षेसाठी एक अॅडव्हान्स टीम, बुलेटप्रुफ व्हेईकल आणि जॅमर पाठवलं जाईल.

पत्नी जशोदाबेन यांनाही पुरविली जाणार सुरक्षा
याच पद्धतीची सुरक्षा मोदींपासून वेगळी राहणारी त्यांची पत्नी जशोदाबेन आणि आई हीर बेन यांनाही पुरविली जाईल. एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मोदी, त्यांची पत्नी जशोदाबेन आणि आई हीराबेन यांना सुरक्षा पुरविण्यासाठी एसपीजीनं ग्राऊंड वर्क केलाय. मोदी पंतप्रधान बनताच त्यांची पत्नी असल्यानं जशोदाबेन यादेखील आपोआपच एसपीजीची सुरक्षा मिळवण्याच्या हक्कदार असतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जशोदाबेन यांना जिल्हा मुख्यालय किंवा गांधीनगरला हलवलं जाऊ शकतं. एसपीजीला योग्य वाटेल अशाच ठिकाणी जशोदाबेन यांना हलवण्यात येईल. मोदी जर पंतप्रधान बनले तर जशोदाबेन यांना कुठे हलवायचं याबद्दल मोदींशी संपर्क करण्यात येईल. त्यांना डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर किंवा गांधीनगरमध्ये हलवण्याची मागणीही यावेळी एसपीजीकडून केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या मोदींना झेड प्लस सुरक्षा पुरविली गेलीय. एनएसजी कमांडो आणि गुजरात पोलीस सध्या मोदींच्या सुरक्षेसाठी दक्ष आहेत.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 12:48
First Published: Friday, May 16, 2014, 12:49
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?