पत्ता कापल्यानंतरही कलमाडी समर्थकांनी हवा दाखवली

पत्ता कापल्यानंतरही कलमाडी समर्थकांनी हवा दाखवली
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातून उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी आज पुण्यात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

युथ कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी जेलची हवा खाऊन आलेल्या कलमाडींना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. तरीही ते स्वतःसाठी किंवा पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी खटपट करत होते.

मात्र काँग्रेसनं त्यांना डावलून युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिलीय.

कलमाडी हे ज्येष्ठ नेते असून त्यांचे कार्यकर्ते आपल्यासाठी काम करतील असा विश्वास विश्वजीत यांनी व्यक्त केलाय.

मात्र स्वतःला पुण्याचे कारभारी म्हणवणारे कलमाडी काय भूमिका घेतात, याकडं सर्वाचं लक्ष लागलंय.

कलमाडी समर्थकांची खास बैठक उद्या आयोजित करण्यात आली असून, त्यावेळी ते आपला निर्णय जाहीर करतील, असं सांगितलं जातंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 22:01
First Published: Thursday, March 20, 2014, 22:06
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?