पुण्यात कलमाडी समर्थक आणि विरोधकांची जुंपली

पुण्यात कलमाडी समर्थक आणि विरोधकांची जुंपली
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलमाडी समर्थक आणि कलमाडी विरोधक यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा उफाळून आलंय. पक्षातून निलंबित असलेल्या कलमाडींचे उंबरे झिजवणाऱ्यांनी निर्णय आधी घ्या आणि मगचं पुढचे बोला, अशी जाहीर भूमिका प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांनी घेतल्याने पक्षामध्ये खळबळ उडालीय.

लोकसभेसाठीचा पत्ता कापला गेल्यानंतर कलमाडी पुण्यात परतल्यापासून त्याचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरु आहे. आमदार रमेश बागवे, उपमहापौर बंडू गायकवाड यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी त्यांना जाऊन भेटताहेत. विशेष म्हणजे हे कलमाडी समर्थक कलमाडी हाऊसचे उंबरे झिजवतानाच काँग्रेसच्या कार्यक्रमांना देखील हजेरी लावताहेत. त्यांच्याविषयी पक्षाने नेमकी भूमिका घेण्याची मागणी बालगुडे यांनी केलीय.

दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा केल्याचा ठपका ठेवलेल्या सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने चार हात दूर ठेवले आहे. त्यांना उमेदवारी न देता पंतगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कलमाडी बंडाच्या पवित्रात आहेत. त्यांनी पुण्यात समर्थकांची बैठक घेतली. दरम्यान, कलमाडी समर्थकांनी पक्षविरोधी काम केल्यास, कारवाई करण्याचा इशारा हर्षवर्धन पाटल यांनी दिलाय.

तर दुसरीकडे कलमाडी कमालीचे आक्रमक झाले आहेत. मला भाजप सोडून इतर पक्षांनी संपर्क केलाय. मात्र मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सुरेश कलमाडींनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर पत्नीला उमेदवारी न मिळाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

`मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय... यश नक्की मिळणार...` असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकलेले कलमाडी यानंतर म्हणतात `माझा काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या बायकोला तिकीट द्या, अशी मागणी मी केली होती... माझी बायको दोषी नाही... मग, तिला का तिकीट दिलं गेलं नाही?, असा त्यांचा प्रश्न आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 22, 2014, 21:31
First Published: Sunday, March 23, 2014, 10:18
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?