देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला संदेश

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला संदेश
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

मै नरेंद्र दामोदरदास मोदी... हे वाक्य आज राष्ट्रपती भवनात दणाणलं आणि देशाच्या 15व्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. मोदी पंतप्रधान होताच पंतप्रधान कार्यलायची वेबसाईट www.pmindia.nic.in बदलली. नरेंद्र मोदींचा फोटो आणि नरेंद्र मोदींची संपूर्ण माहिती यात देण्यात आली.

नेहमीच टेक्नोसॅव्ही असलेले नरेंद्र मोदी लगेच वेबसाईटवर ऍक्टिव्ह झालेत. त्यांनी वेबसाईटच्या माध्यमातून देशवासियांना आपला पहिला संदेश दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला संदेश

प्रिय भारतीय आणि जगभरातील तमाम नागरिकांना माझा नमस्कार ! भारताच्या पंतप्रधानपदाच्या वेबसाईटवर तुमचं सर्वाचं मन:पूर्वक स्वागत.

भारतातल्या जनतेनं १६ मे २०१४ रोजी जनमताचा कौल दिला. जनतेनं विकास, चांगलं प्रशासन, आणि स्थिर सरकारला जनाधार दिलाय. त्यानुसार देशाला अत्युच्य शिखरावर नेण्यासाठी मी स्वतःला झोकून देतोय. त्यासाठी मला तुमचा पाठिंबा, आशिर्वाद आणि सक्रिय सहभागाची गरज आहे.

आपण सर्वजण मिळून गौरवशाली भारताच्या आलेख उंचावू, सर्वजण एकत्र, भक्कम, विकासाचं सर्वसमावेशक स्वप्न पाहू आणि विकास आणि शांतता राखण्यावर भर देऊ.

माझी अशी संकल्पना आहे की, ही वेबसाईट आपल्यामधील संवादाचा फार मोठा दुवा आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आणि सोशल मीडिया जगभरातल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचा माझा ठाम विश्वास आहे. माझी अशी अपेक्षा आहे की या व्यासपीठाच्या माध्यमातून सुसंवाद, देवाणघेवाणीसाठी मोठी संधी निर्माण होईल.

या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला माझं भाषण, माझी दैनंदिनी, परदेश दौरे आणि इतरही ताज्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळेल, त्याचबरोबर सरकारच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहितीही मिळेल.

आपला,

नरेंद्र मोदी



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 26, 2014, 21:36
First Published: Monday, May 26, 2014, 21:36
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?