उत्तरभारतीयांना पुन्हा मारीन - राज ठाकरे

उत्तरभारतीयांना पुन्हा मारीन - राज ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

उत्तर भारतीय माझ्या मराठी मुलांच्या तोंडातील घास हिसकवून घेत असतील तर पुन्हा मारीन असे सज्ज दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लालबाग येथील मेघवाडी सभेत दिला.

मनसेचे दक्षिण मुंबई मतदार संघातील उमेदवार बाळानांदगावकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी टीव्ही चॅनलवर सुरू असलेल्या मुलाखतींबाबत बोलत होते. ते म्हणाले अनेक हिंदी चॅनलचे पत्रकार मला प्रश्न विचारतात की तुम्ही उत्तर भारतीयांना मारतात, त्यावर राज ठाकरे म्हणाले, उत्तर भारतीय माझ्या मराठी मुलांच्या तोंडातील घास हिसकवून घेत असतील तर पुन्हा मारीन.

परप्रांतीय महाराष्ट्रात येतात. त्यांना नोकऱ्या मिळवतात, पण माझे मराठी मुले नोकरीपासून वंचीत राहतात. माझ्या मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या परप्रांतीयांचे ओझे आम्ही काय वाहायचं. इतर राज्यातील या उत्तर भारतीयांना लाथाडतात, पण त्यांना कोणी देशाच्या आस्मितेबद्ल सांगत नाही फक्त आम्हांला देशाच्या अखंडतेबद्दल डोस पाजले जातात, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

काय म्हटले राज ठाकरे लालबागच्या सभेत

> मुंबईच्या पाईपलाइनला लागून ४० हजार झोपड्या- राज
> अबू आझमीसारखा माणूस येथे दोन ठिकाणी कसा निवडू येतो- राज
> देशाची आस्मिता बोलण्याचं महाराष्ट्राला सांगितले जातं, पण इतरांना सांगितलं जात नाही - राज ठाकरे
> महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशनवर सर्व स्टॉल कोणाचे, परप्रांतीयांना कसे मिळतात हे स्टॉल - राज ठाकरे
> परप्रांतीयांचं ओझ आम्ही का सोसायचं - राज ठाकरे
> मतदार यादीतून नाव वगळणं हे काँग्रेसच गलिच्छ राजकारण - राज ठाकरे
> महाराष्ट्रातील माझ्या बांधवांच्या तोंडातील घास पळविणार तर परप्रांतियांना पुन्हा मारणार - राज ठाकरे


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 21, 2014, 21:49
First Published: Monday, April 21, 2014, 21:49
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?