काँग्रेस, केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल, देशासाठी हे धोकादायक - मोदी

काँग्रेस, केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल, देशासाठी हे धोकादायक - मोदी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आजपासून सुरु झालेल्या भारत विजय रॅलीत अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल केला. केजरीवाल पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानला तीन AK मिळाले आहेत, AK -47 , AK एन्टोनी आणि एके -49 म्हणजेच केजरीवाल हे तीन एके असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.

मोदींनी उधमपूरमधील हिरानगर मतदार संघातून आपल्या `भारत विजय सभां`ना सुरूवात केली. घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे असल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस युवकांची फसवणूक करत आहे, असा आरोपही मोदींनी केला. यूपीए सरकारच्या काळात देशातील जवानांचे शिरच्छेद केले जात आहेत, रोजगाराच्या समस्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावाने ठणठण गोपाळ राजकारण सुरू आहे मग, अशा घराणेशाहीला निवडून देऊन तुम्ही काय साधणार? असा सवालही मोदींनी केला.

देशाला सध्या तीन एक्क्यांचा धोका आहे. पहिला आहे `एके-४७` या बंदुकीतून देशाच्या जवानांची पाकिस्तानकडून हत्या केली जात आहे. दुसरा आहे ए.के.अँटनी- भारताचे संरक्षण मंत्री कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरले. भारतीय सैनिकांवरील हल्ल्यानंतर ए.के.अँटनींनी केलेली वक्तव्ये भारतालाच त्यांच्यापासून धोका असल्यासारखी वाटणारी आहेत.
तिसरा आहे `एके-४९` म्हणजे देशात सध्या नवीन एके-४९ पक्ष (आम आदमी) जन्माला आला आहे की जो, देशालाच दुभागण्याचे काम करत आहे. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर चक्क पाकिस्तानात असल्याचे दाखविण्यात आले आहे, मग असे पक्ष देश कसा सांभाळणार? असा सवालही मोदींनी उपस्थित केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 26, 2014, 15:35
First Published: Wednesday, March 26, 2014, 15:35
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?