www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगरगुजरातमध्ये गांधीनगरमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नरेंद्र मोदींसोबत बैठक झाली. तब्बल पाच तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत निवडणूक आणि एक्झिट पोलवर चर्चा झाली.
बैठक झाल्यानंतर राजनाथ सिंहांनी पत्रकारांना माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत मोदीच भाजपचे पंतप्रधान बनतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नरेंद्र मोदी 17 मे रोजी दिल्लीत येणार आहेत. त्यानंतर भाजपकडून संसदीय मंडळाची बैठक घेतली जाईल असं राजनाथ सिंहांनी जाहीर केलं.
याच बैठकीत मोदींनंतर गुजरातच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असंही ते म्हणाले. एनडीएमध्ये येऊ इच्छणाऱ्या पक्षांचं स्वागतच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खरं तर या बैठकीसाठी सुषमा स्वराज उपस्थित राहतील असा प्रयत्न भाजपकडून केला जात होता. मात्र सुषमा स्वराज भोपाळला गेल्यानं त्या या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 15, 2014, 10:05