www.24taas.com, झी मीडिया, नंदुरबारनंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांच्या प्रचारासाठी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी सभा घेणार आहेत. नंदुरबार आणि गांधी घराणं यांचं अनोखं नातं आहे.
कारण इंदिरा गांधीही आपल्या प्रचाराची सुरूवात नंदुरबारपासून करत.
नंदुरबारच्या आदिवासींना गांधी घराण्याबद्दलची उत्सुकता आजही कायम आहे का हे आजच्या सभेची उपस्थिती आणि मतदानाचा निकाल यावरून कळणार आहे.
नंदुरबारमध्ये याआधी ५ मार्चला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गावितांसाठी सभा घेतली होती. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित हे आतापर्यंत पराभूत झालेले नाहीत. मात्र त्यांच्यासमोर भाजपच्या उमेदवार हीना गावित यांनी आव्हान उभं केलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 20, 2014, 09:24