www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोळाव्या लोकसभेसाठी आज राज्यातील तिसरा तर देशातील सहाव्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यात 11 राज्य आणि एक केंद्र शासिक प्रदेशातील 117 जागांचा समावेश आहे.
यात तामिळनाडूच्या 39, महाराष्ट्राच्या 19, उत्तर प्रदेशच्या 12, मध्य प्रदेशातील 10, बिहार आणि छत्तीसगडच्या सात आणि आसाम तसेच पश्चिम बंगालच्या सहा-सहा तसेच राजस्थानच्या पाच, झारखंडच्या चार तसेच पदुच्चेरी आणि जम्मू-काश्मिरच्या एक-एक लोकसभा सीटसाठी आज मतदान होतंय. याच टप्प्यात मध्यप्रदेश आणि तामिळनाडूत प्रत्येकी एका जागेवर मतदान होतंय.
देशभरातील टक्केवारी, दुपारी 6 पर्यंत> बिहार - ६० टक्के (रांगा असल्याने वाढण्याची शक्यता)
> झारखंड - ६३.४ टक्के
> आसाम - ७७.०५ टक्के
> पश्चिम बंगाल - ८२ टक्के
> उत्तर प्रदेश - ५८.५ टक्के ( १२ टक्के वाढ)
> मध्य प्रदेश - ६४.०४ टक्के (११ टक्के वाढ)
> राजस्थान - ५९.२ टक्के (१० टक्के वाढ)
> छत्तीसगड - ६२.५ टक्के
> तामिळनाडू - ७३ टक्के
> पुद्दुचेरी - ८२ टक्के
> महाराष्ट्र - ५५.३३ टक्के
सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची स्थिती देशात लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदानाचा सहाव्वा तर महाराष्ट्रात तिसऱ्या टप्पा पार पडला. आज मतदान हे आपलं कर्तव्य आहे, अशाच विचारात बंगालचे नागरिक रस्त्यावर उतरताना दिसले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी ७९ टक्के मतदान नोंदवलं गेलं. तर देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत सर्वात कमी म्हणजेच अंदाजे ४५-५० टक्के मतदान नोंदवलं गेलंय. त्यामुळे, अनेकदा कठिण प्रसंगी दिसून आलेलं मुंबईकरांचं 'ते' स्पिरीट आज कुठे गेलं? असा प्रश्न अनेकांना पडल्यावाचून राहिला नाही.
आज मतदान झालेल्या बंगालच्या विविध मतदारसंघांवर एक नजर टाकुयात... (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) * रायगंज - ७९.७८%
* जांगिपूर - ७९%
* मुर्शिदाबाद - ८२.२४%
* मालदा उत्तर - ८०.६७%
* मालदा दक्षिण - ८०.१६%
* बालुरघाट - ८२.८४%
देशभरातील टक्केवारी, दुपारी 3 पर्यंतदुपारी 3 पर्यंत तमिळनाडूत 60.52%, पश्चिम बंगालमध्ये 60%, मध्य प्रदेशमध्ये 45%, छत्तीसगडमध्ये 54%, पुडुचेरीत 67% आणि आसाममध्ये 55% मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
दुपारी 2 पर्यंत मध्यप्रदेशात 42.29 टक्के मतदान झाले.
मुंबईच्या मतदानाचा टक्का थोडाफार वाढणारमुंबईच्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीत 44 टक्के होती, हा आकडा 50 च्या आसपास जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत 60 च्या दशकात सर्वाधिक 68 टक्के मतदान झालं होतं, तो रेकॉर्ड यावेळी तुटेल, असं वाटत होतं, मात्र त्यावरही पाणी फिरणार असल्याचं चित्र सध्या आहे.
मुंबईपेक्षा दक्षिणेतील चेन्नईचा आकडा वाढला आहे. राज्यातही मतदानाच्या टक्केवारीत फार मोठी वाढ झालेली दिसत नाहीय. पश्चिम बंगालमध्ये यावर्षीही विक्रमी मतदान होणार असं चित्र आहे.
आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या नंदुरबार मतदार संघात यावेळी मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय.
आसाममध्ये पोलिसाचा मृत्यूआसामच्या कोकराझारमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ बीएसएफच्या जवानांकडून गोळीबार, एका पोलिसाचा मृत्यू
निवडणूक कर्मचारीचा मृत्यूठाण्यात निवडणूक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षिका वैशाली भाले यांचा मृत्यू झाला आहे.
खोपट मतदान केंद्रावरील ही घटना आहे. वैशाली भाले यांना चक्कर येत होती, यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.
देशभरातील टक्केवारी, दुपारी 1 पर्यंतदुपारी 1 पर्यंत -
झारखंड 43 टक्के मतदानदुपारी 1 पर्यंत -
उत्तर प्रदेश 36.62 टक्के मतदानदुपारी 1 पर्यंत -
मुंबई 23 टक्के मतदानदुपारी 1 पर्यंत -
पश्चिम बंगाल 60 टक्के मतदानदुपारी 1 पर्यंत -
बिहार 37 टक्के मतदानदुपारी 1 पर्यंत -
मध्य प्रदेश 37 टक्के मतदानUPDATES, सकाळी 11 पर्यंतदक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतचं मतदान
पश्चिम बंगाल : 28 टक्के, दुपारी 12 पर्यंत
बिहार : 15 टक्के, दुपारी 11 पर्यंत
मध्यप्रदेश : 14 सकाळी 8 पर्यंत
पॉडेचरी : 10 टक्के सकाळी 9 पर्यंत
झारखंड : 13.37 टक्के सकाळी 9 पर्यंत
आसाम : 17 टक्के सकाळी 9 पर्यंत
तामिळनाडू : 14.31 सकाळी 9 पर्यंत
बिहारसुपौल, अररिया, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर आणि बांका. यात सुपौल आणि बाका सोडून सर्व पाच जागांवर मुस्लिम मतदारांची महत्वपूर्ण भूमिका असेल. किशनगंजमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
झारखंडधनबाद, दुमका, राजमहल आणि गोड्डा लोकसभेसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. दुमका मतदार संघात झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि बाबूलाल मरांडी यांचा भवितव्याचा आज फैसला होणार आहे. या उमेदवारांची लढत भाजपाचे सुनील सोरेन यांच्याशी आहे.
धनबादचा काही भाग नक्षलग्रस्त असल्याने, या मतदारसंघात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
छत्तीसगडछत्तीसगडच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होतंय. यात रायपूर, बिलासपूर, दुर्ग, सरगुजा, रायगढ़, कोरबा आणि जांजगीर-चांपा या सात लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.
तमिलनाडूतमिलनाडूत अन्ना द्रमुक, द्रमुक आणि भाजपात लढत आहे. भाजपने राज्यातील सहा पक्षांसोबत आघाडी केली आहे. काँग्रेसने मात्र कुणाशीही हात मिळवणी न करता स्वतंत्रपणे निवडणूक रिंगण लढवलं आहे.
मध्यप्रदेशमध्य प्रदेशातील 10 लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होतंय, यात विदिशा, देवास, उज्जैन, मंदसौर, रतलाम, धार, इंदूर, खरगोन, खंडवा आणि बैतूलचा समावेश आहे. यात सर्वात मोठा मतदार संघ हा इंदूर आहे.
इंदूर मतदार संघात मतदारांची संख्या 21 लाखांच्यावर आहे. इंदूरमधून भाजपच्या उमेदवार सुमित्रा महाजन मैदानात आहेत. सुमित्रा महाजन 1989 पासून एकदाही निवडणुकीत पराभूत झालेल्या नाहीत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 24, 2014, 08:27