छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात 12 ठार

छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात 12 ठार
www.24taas.com, झी मीडिया, रायपूर

छत्तीसगडमधील बिजापूर तालुक्यात निवडणूक अधिकारी पथकावर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्यात यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसह राखीव दलाचे जवान ठार झालेत. मृतांचा आकडा 12 असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्यासाठी एक बस आणि अॅब्युलन्स वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन ठिकाणी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सात निवडणूक अधिकारी आणि राखीव दलाचे पाच जवान ठार झाले आहेत. बिजापूरमधल्या केतुलनारमध्ये बसमधून निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा रक्षक जवान जात होते, यावेळी भूसुरुंगांचा स्फोट नक्षलवाद्यांनी घडून आणला.

दुस-या घटनेमध्ये कामनारमध्ये अॅब्युलन्स उडवण्यात आली. यात अॅब्युलन्समध्ये राखीव दलाचे पोलीस होते. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत तर चारजण जखमी झाले आहेत.

बस्तरमधल्या मतदारसंघामध्ये १० एप्रिल रोजी मतदान झाले होते, आणि पुन्हा मतदानाची तयारी सुरू होती. जवळपास ७५ ते १०० नक्षलवाद्यांचा समावेश असलेल्या पथकांनी हे हल्ले घडवून आणल्याचे पोलीसांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये अनेक मतमोजणी यंत्रांचेही नुकसान झाले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 12, 2014, 22:37
First Published: Saturday, April 12, 2014, 22:37
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?