मोदींच्या शपथविधीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!

मोदींच्या शपथविधीला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारताचे 15वे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तसंच शिवसेनेचे खासदार अनंत गिते हे नवाझ शरीफ यांच्यासमोरच मंत्रीपदाची शपथ घेतील, असेही संकेत मिळतायेत.

मोदींच्या शपथविधीला सार्क राष्ट्रांच्या पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. नेहमीच पाकिस्तानच्या विरोधात असलेली शिवसेना यावेळी मात्र बॅकफूटवर दिसतेय.

मोदींच्या शपथविधीला आपल्या बाजूनं कोणत्याही प्रकारचा खोडा नको म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व खासदारांनाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यास सांगितल्याचंही कळतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जायच्या अगोदर ते मीडियाशी बोलण्याचीही शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 25, 2014, 19:58
First Published: Sunday, May 25, 2014, 20:55
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?