वाजपेयी आतापर्यंतचे सर्वात दुर्बल पंतप्रधान - काँग्रेस

वाजपेयी आतापर्यंतचे सर्वात दुर्बल पंतप्रधान - काँग्रेस
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपने मनमोहनसिंह यांना आतापर्यंतचे दुर्बल पंतप्रधान म्हटल्यानंतर, काँग्रेसनेही भाजपवरही हल्ला केला आहे.

काँग्रेसने सोमवारी वाजपेयींनाआतापर्यंतचे सर्वात दुर्बल पंतप्रधान असल्याचं सांगून, भाजपवर कोलांटीउडी मारली आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांना सिमांचे संरक्षण करता आले नाही, आणि पाकिस्तानशी संबंध ठेवतांना भारताच्या भल्याची जाणीव न ठेवल्याची टीका, टिवटरच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी केली आहे.

तसेच गुजरात दंगलींनंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही वाजपेयी हाताळू शकले नाहीत, असा घणाघाती टोलाही संजय झा यांनी लगावला आहे.

वाजपेयींना मोदींना बडतर्फ करायचे होते, परंतु ते भाजपातील अन्य नेत्यांच्या जबावाला बळी पडल्याचा म्हणून ते दुर्बल होतेच असा आरोप संजय झा यांनी केला आहे.

वाजपेयी नवाझ शरीफना अलिंगन देत होते, त्यावेळी पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करत ५० भारतीय जवानांचे प्राण घेतल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख एक संपूर्ण रात्र भारतीय भूमीवर होते आणि त्यावेळी पंतप्रधान आणि भारत सरकार गाढ झोपेत होते, असाही दाखला झा यांनी दिला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 23:40
First Published: Monday, April 14, 2014, 23:41
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?