चिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध

चिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध
www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद

केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली. आपल्या कुटुंबासह मतदान करण्यासाठी आलेल्या चिरंजीवी यांनी रांग मोडून मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका तरूणानं त्यांना अडवून रांगेत उभं राहण्यास सांगितलं.

मतदान केंद्रावर हा सर्व प्रकार घडत असल्यानं चिरंजीवी यांना शरमेनं मान खाली घालत रांगेत उभं राहून मतदान करावं लागलं. आज सकाळी हैदराबादच्या जुबिली हिलमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचताच चिरंजीवी मतदानासाठी आत जाऊ लागले. पण मतदानासाठी आधीपासूनच रांगेत असलेल्या एका तरूणानं त्यांना थांबवलं. रांगेत उभं राहून तुम्ही मतदान करू शकत नाही का? असा सवाल त्या तरूणानं चिरंजीवींना केला.

त्यावर चिरंजीवी यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तरूण आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. यावेळी मतदान केंद्राच्या परिसरातील कोणीही चिरंजीवी यांची बाजू घेण्यासाठी आलं नाही. त्यामुळं तरूणाच्या मागणीपुढं झुकत शरमेनं चिरंजीवी यांना रांगेत मागे जाऊन उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी मतदान केलं. या सर्व प्रकारामुळं चिरंजीवी यांच्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता आणि त्यांचे कुटुंबीय भयंकर चिडले होते. पण चिरंजीवी यांनी चेहऱ्यावर मिश्कील भाव आणत काहीही झालं नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 13:18
First Published: Wednesday, April 30, 2014, 13:18
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?