विदर्भात मतदानाला उत्तम प्रतिसाद

विदर्भात मतदानाला उत्तम प्रतिसाद
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

महाराष्ट्रात रणसंग्रामाला सुरुवात झालीय. विदर्भातल्या १० जागांसाठी आज मतदान झालं. राज्यात पहिल्या टप्प्यात ६१.१० टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेवार, काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक, भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर या दिग्गज नेत्यांचे  भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

मतदानाची आत्तापर्यंतची स्थिती

सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान

अमरावती – ६५ टक्के
रामटेक – ५५.५४ टक्के
नागपूर – ५२.२० टक्के
यवतमाळ -६०.१० टक्के
चंद्रपूर – ६५.१० टक्के
अकोला – ६५ टक्के
भंडारा-गोंदिया – ६१ टक्के
वर्धा – ६४ टक्के
गडचीरोली – ६१ टक्के
बुलडाणा – ५८.६६ टक्के

दुपारी ५ वाजेपर्यंत मतदान
विदर्भात सरासरी ५५ टक्के मतदान
गडचिरोली -चिमूर - ६४ टक्के
नागपूर - ५२.३२ टक्के
बुलडाणा - ५५ टक्के
रामटेक - ५१ टक्के
वर्धा - ५८.०८
अमरावती - ५७.२
अकोला - ५२.९०
भंडारा-गोंदिया - ६०.६०
चंद्रपूर - ५९.६०
यवतमाळ - ५१.२६

दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान
बुलडाणा - ४० टक्के
अकोला - ४२
अमरावती - ४८
वर्धा - ४१
रामटेक - ३७
नागपूर -४०
भंडारा - ४२. ८७
गडचिरोली - ४४
चंद्रपूर - ४३.२६
यवतमाळ - ३९.९३

दुपारी २ वाजेपर्यंत मतदान
नागपूर - ३९.२५ टक्के
रामटेक - ३६.४० टक्के

दुपारी १ वाजेपर्यंत मतदान
नागपूर - २६.१५ टक्के
रामटेक - २५.२० टक्के
अकोला - २९.६० टक्के
अमरावती - ३२.१७ टक्के
वर्धा - २७.४६ टक्के
बुलढाणा - ३२.४० टक्के
चंद्रपूर - ३०.२० टक्के
यवतमाळ - २९.६७ टक्के
गडचिरोली - ४४ टक्के
भंडारा - ३१.१४ टक्के

दुपारी १२ वाजेपर्यंत
* नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलं. नागपूरातून नितीन गडकरी निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

* अकोला लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार संजय धोत्रे यांनी आपल्या पळसोबढे या आपल्या मुळगावी मतदान केल. संजय धोत्रे यांनी आपल्या कुटुंबीयांसह रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजावलाय. अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांची लढत भारीप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्याशी आहे.

* अकोला लोकसभा मतदार संघातले उमेदवार आणि भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही अकोल्यात आपला मतदान हक्क बजावलाय. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.

* चंद्रपूरचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांनीही सामान्य मतदारांसह रांगेत उभं राहून मतदान केलं. पहिल्यांदाच मतदार करणाऱ्या रघुवीर आणि श्याम या आपल्या दोन मुलांसह हंसराज अहिर यांनी हिंदी सिटी शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांमध्ये उत्साह असून मतदान मतदानाच्या प्रमाणात वाढ होईल असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला. 

* ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे आणि त्यांच्या पत्नी भारती आमटे यांनी देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला.वरोरा आनंदवन येथे उभयतांनी मतदान केलं.

* नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी मतदान केलं. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्य़ाशी त्यांची लढत होतीय.

* भंडारा  मतदार संघातले भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी पूजा अर्चना करुन सहपरिवार मतदान केलं.


सकाळी १० वाजता
अकोला : १२ टक्के
नागपूर : ७.११ टक्के
बुलडाणा : ७.३६ टक्के
चंद्रपूर : ६.९६ टक्के
गडचिरोली : १०.२१ टक्के
वर्धा : ७ टक्के
यवतमाळ-वाशिम : ५.८४ टक्के
अमरावती : ५.२० टक्के
रामटेक : ६ टक्के
भंडारा-गोंदिया : १० टक्के


सकाळी ९ वाजता
* चंद्रपूरमध्ये माजरी मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात

* नागपूरमध्ये मतदानाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनीही मतदानाचा हक्क बजावला.

* भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार आणि आपच्या अंजली दमानिया यांच्याशी त्यांची लढत होतेय. आज त्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होतंय.

* आरएसएसचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि प्रवक्ते राम माधव यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भैय्याजी जोशी यांनी देशामध्ये मोदींची लहर असल्याचं सांगितलं. तसंच या निवडणुकीत संघाची भूमिका सक्रीय राहिली असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सकाळी ८ वाजता
* चंद्रपूरमध्ये माजरी मतदान केंद्रावर अजूनही मतदानाला सुरुवात झालेली नाही. माजरी मतदान केंद्रावरच्या इव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मतदानाला उशीर

* बुलडाण्यात मतदानाला सुरुवात झाली. इथं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्य लढत होतेय. शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे आमने सामने आहेत.

देशभरात ९१ जागांसाठी आज मतदान
राज्यात विदर्भातील दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. देशभरात ९१ जागांसाठी आज मतदानाला सकाळपासून सुरूवात झाली आहे. विदर्भातील १० मतदारसंघातील १९३ मतदारांचं राजकीय भवितव्य आज मतपेटीबंद होणार आहे.

देशातील सर्व नक्षलग्रस्त भागात आज मतदान होत आहे. म्हणून आजच्या मतदानाकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया भंडाऱ्यासह इतर जिल्ह्यांमध्ये कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्याही ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.

विदर्भातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत. या भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी, तसेच आपच्या नेत्या अंजली दमानिया, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सात वेळेस लोकसभेवर निवडून गेलेले विलास मुत्तेमवार, तसेच काँग्रेसच्या मुकूल वासनिक यांचा समावेश आहे.

वाढत्या उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन यावेळी मतदानाची वेळ तासभर वाढवण्यात आली आहे. यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 10, 2014, 08:22
First Published: Friday, April 11, 2014, 09:29
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?