राष्ट्रवादीचा तो 'दानशूर' कार्यकर्ता कोण?

राष्ट्रवादीचा तो `दानशूर` कार्यकर्ता कोण?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आयकर खात्याने नोटीस पाठवलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यात जमा असलेल्या 20 कोटी 75 लाखाच्या देणगी मदतनिधीचा ‘दानशूर’ कोण? यावरुन ही नोटीस पाठवली गेलीय.

गेल्या काही वर्षात 61 कोटी 56 लाखाची देणगी मदत पक्षाला देण्यात आलीय. त्यापैंकी 34 कोटी 75 लाखाची देणगी ही रोख स्वरुपात होती. यादरम्यान मार्च एप्रिलमध्ये 20 कोटी 75 लाखाची पॅन नंबर नसलेली देणगी राष्ट्रवादीला अडचणीत आणणारी ठरणार आहे.

यावरुन आयकर खात्याने स्पष्टीकरण मागवलंय. दरम्यान, राष्ट्रवादीच्या गोटातून ‘सदरची रक्कम ही राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरुन देण्यात आलीय. त्यामुळे पॅन नंबरचा प्रश्न उदभवलाय’ असं स्पष्टीकरण घाईघाईत देण्यात आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 12, 2014, 12:55
First Published: Monday, May 12, 2014, 14:05
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?